जय हिंद !
मी असोसिएट एनसीसी ऑफिसर ए. एन .ओ. फर-ट ऑफिसर तथा माध्यमिक शिक्षक श्री एस पी सूर्यवंशी सर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची, गेवराई तालुका गेवराई, जिल्हा बीड. महाराष्ट्र
51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी औरंगाबाद ग्रुप कमांडिंग विभाग औरंगाबाद.
ज्या शाळेत मी माध्यमिक शिक्षण व एनसीसी छात्र म्हणून शिक्षण घेतले आहे त्याच शाळेत मी सध्या माध्यमिक शिक्षक एनसीसी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे या शाळेत मला शिक्षक व
एनसीसी विभाग प्रमुख
म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली या गोष्टीचा मला मनुमान खूप आनंद वाटतो आहे
एनसीसी हा विभाग माझ्याकडे 1998 ते 2022 पर्यंत या म्हणजे 25 वर्ष विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्य करत आहे. एनसीसी ध्येय ब्रीद वाक्य एकता और अनुशासन एनसीसीच्या हे ध्येय विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. ध्येयानुसार एनसीसी
छात्रांमध्ये शिस्त साहस नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्यात मी यशस्वी
एनसीसीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्याचा त्यांना जीवनात फायदा झाला.
एनसीसी छात्र म्हणून राहिलेले अनेक विद्यार्थी संरक्षण दल .भारतीय सेना. पोलीस दल. एस आर पी. सी आर पी. होमगार्ड इत्यादी ठिकाणी त्यांना नोकरी भरतीसाठी फायदा झाला.
एनसीसीच्या योजना माध्यमातून मला अनेक कार्य करण्याची ऊर्जा मिळाली त्यामध्ये प्रत्येक योजनेमध्ये मोठ्या हिरारीने सहभाग घेतला मग ते पल्स पोलिओ, एड्स जनजागरण, साक्षरता अभियान, वृक्षारोपण ,मतदार जागृती अभियान, स्वच्छता अभियान, रक्तदान, तंबाखू विरोधी जनजागरण ,पूरग्रस्त, भूकंपग्रस्त मदत व निधी उभारण्यासाठी नाट्यछटा काव्य, एकांकिका ,सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व सामाजिक व राष्ट्रीय योजनेमध्ये आमच्या शाळेचा सहभाग त्यामध्ये एनसीसी सतत अग्रेसर असायची.
भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या विविध योजनेचा प्रसिद्धी व प्रसा र करण्याचे कार्य अनेक पद्धतीने करण्यात आले प्रभात फेरीच्या माध्यमातून विविध शाळा आणि महाविद्यालय स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन यश मिळविले आहे. एनसीसीच्या वार्षिक कॅम्प मध्ये ज्या विविध स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश मिळवले आहे.
शाळेच्या एनसीसीच्या छात्रांची ड्रिल वरून ओळख व्हायची ड्रिल म्हणजे ड्रिलच असायची
छात्रांनी अनेक वेळा शाळेचे नाव गौरविले आहे उंचावले उज्वल केले आहे विद्यार्थ्यांना माझ्या कामाचा व शाळेचा गर्व असल्याचे दिसून आले.
अनेक वेळी शाळेचे मुख्याध्यापक सहकारी वरिष्ठ शिक्षक बंधू-भगिनी सहकारी शिक्षक मित्र यांचे मार्गदर्शन व मदत सहकार्यातून प्रोत्साहन व शक्ती मिळाली त्यामुळे हे कार्य करू शकलो यामध्ये विशेष सहकार्य पत्रकार मित्रांनी केले.
एनसीसीच्या व शाळेच्या माध्यमातून तसेच मंडळाच्या सहकार्यातून मला अनेक स्तरावरील पुरस्कार मिळालेले आहेत.
शाळेतील शैक्षणिक अति उत्कृष्ट कार्यामुळे दोन जागा वेतनवाडीही मिळालेले आहेत त्यामुळे मला शिक्षण व सामाजिक क्रीडा क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार खालील प्रमाणे मिळालेले आहेत
जिल्हा परिषद बीड आदर्श शिक्षक पुरस्कार,
बीड जिल्हा शक्ती प्रतिष्ठान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,
गेवराई तालुका महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार,
गेवराई नगरपरिषद आदर्श शिक्षक पुरस्कार , भारतीय स्टेट बँक आदर्श शिक्षक पुरस्कार, भारतीय जैन संघटना आदर्श शिक्षक पुरस्कार,
राज्यस्तरीय अष्टविनायक ज्ञानदीप कला व सांस्कृतिक क्रीडा मंडळ गेवराई आदर्श शिक्षक पुरस्कार,
गेवराई नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांचे
विशेष सन्मानपत्र,( गौरव पत्र) शारदा प्रतिष्ठान क्रीडा कबड्डी स्पर्धेत पंच ,
अनेक शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्था यांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
महाराष्ट्र राज्य पुणे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बीड जिल्हा परिषदेने दोन वेळेस शिफारस केलेली होती सामाजिक वनीकरण व आरोग्य विभाग यांचेही पुरस्कार मिळालेले आहेत.
एनसीसी छात्रांच्या अंगी शिस्त प्रामाणिकपणा मेहनत
नमस्कार करण्याची जिद्द व व्यसन न करण्याची शपथ निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न याविषयीची महत्त्वकांक्षा अंगी बाळगण्याची शिकवणीचे बाळकडू दिले गेले
शहरांतर्गत शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात विविध स्पर्धेत यश मिळवले आहे एनसीसी चे ड्रिल स्पर्धेत शाळा, महाविद्यालय दोनदा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
विशेष म्हणजे
मला एनसीसी मुळे राष्ट्रीय स्तरावरील कॅम्प त्रिवेंद्र केरळ राज्यात नायर नावाचे मोठे प्रेक्षणीय धरण आहे त्या बाजूलाच आंतरराष्ट्रीय योगा सेंटर तसेच अगस्त ऋषी पर्वतरांगा या अशा रम्य ठिकाणी आर सी टी सी कॅम्प साठी महाराष्ट्राचे छात्र अधिकारी म्हणून जाण्याचे संधी मिळाली ही विशेष गौरवाची बाब आहे माझ्याबरोबर शाळेचेही तीन छात्रांना निवड करण्यात आली छात्र संदीप बांगर, बालाजी टाक, काजी
प्रशिक्षण कॅम्प मध्ये राष्ट्रीय स्तरावरील आरटीसी रॉक क्लिपिंग कॅम्प या स्पर्धेत जम्मू काश्मीर प्रथम महाराष्ट्र द्वितीय केरळ तृतीय
संदीप बांगर याने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले यामुळे शाळेला बटालियन व राज्य यासाठी ही मोठी गौरवाचे बाब ठरली आहे. आरडी परेड साठी शाळेतील छात्र कॅट वन कॅट टॅटू इथपर्यंत पोहोचले पण पात्र ठरू शकले नाही यासाठी छात्र अमर एकशिंगे ,
विशाल सुरडकर ,जोशी, कुलकर्णी ,नावडे ,शेख, सय्यद, पठाण, मोटे, दाभाडे अनेक छात्र
शाळेतील कोणताही कार्यक्रम असो सर्व कार्यक्रमाचे नियोजन एनसीसी विभाग कडे होते त्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्या जाई या गोष्टीचे विशेष कौतुक केले जाई .
शाळेच्या भव्य ग्राउंड वरती समोरील ग्राउंडवर एनसीसी परेड दिवशी ड्रिल चालू होती एनसीसी ग्रुप कमांडिंग ऑफिसर औरंगाबाद ब्रिगेडियर /कर्नल डि.के. शर्मा साहेब हे औरंगाबाद ते आंबेजोगाई व्हिजिट साठी चालले होते. शाळेच्या ग्राउंड वरील एनसीसी परेड ड्रिल चालू असताना त्यांना दिसले आणि त्यांची गाडी शाळेच्या ग्राउंडवर गेटच्या आत आली होती. परेड चालू असताना सिनियर कॅडेटने माननीय ऑफिसर ची गाडी पाहिली आणि गाडीच्या बाहेर येतात नाही तोच सीनियर कॅडेटने रिपोर्टिंग केली
रिपोर्टिंग झाल्यानंतर कॅडेट ने केलेली ड्रिल पाहून ग्रुप कमांडर साहेब यांनी ड्रिलची खूपच प्रशंसा केली अभिनंदन केले आणि खुश होऊन त्यांनी एनसीसी छात्रांना 500 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली हे पाहून सर्व छात्रांना खूपच आनंद झाला यामुळे प्रोत्साहन मिळाले कारण हे बक्षीस ग्रुप कमांडर साहेबांचे होते यामुळे ड्रिल साठी आमची छात्र हमेशाच प्रथम क्रमांक राहिले आहे शाळेच्या एनसीसी छात्रांची ड्रिल खूपच छान राहिलेली आहे. कारण ही ड्रिल पाहण्यासाठी एसटी बस किंवा अनेक वाहने थांबून वाहनातील प्रवासी पाहत असे. एनसीसी छात्रांची ड्रिल खूपच छान त्यामुळे हे सगळे श्रेय माझ्या श्रमशील छात्रांना देतो.
गेवराई नगर परिषद व पंचायत समिती गेवराई या कार्यालयात 'स्वातंत्र्य दिन' 15 ऑगस्ट व 'प्रजासत्ताक दिन "26 जानेवारी या दिवशी ध्वजारोहणाचे सर्व संचलन एनसीसी करत असते
ही बाब शाळेला अतिशय भूषणावह ठरते
खरे म्हणजे या शाळेत मला आणण्यासाठी माझे गुरुवर्य आदरणीय पूज्य श्रीमान एन.एस.मोटे सर आणि मुख्याध्यापक श्रीमान सोनवणे साहेब यांचे मोठे योगदान आहे.
आणि एनसीसी शिफारस करण्यासाठीही त्यांचे मार्गदर्शन राहिलेले आहेत श्रीमान एन. एस. मोटेसर चीफ ऑफिसर(C/O) यांचे याबाबतीत मला खूप मार्गदर्शन मिळालेले आहे.त्यामुळे मी त्यांचा खूप ऋणी व आभारी आहे
व तसेच आरबी अट्टल महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक मेजर प्रदीप मीनासे सर आणि आता उपप्राचार्य मेजर विजय सांगळे सर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे त्यांचाही मी खूप ऋणी व आभारी आहे याबाबतीत माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी व मित्र यांचेही सहकार्य लाभले आहे. यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी हे यश मिळवू शकलो माझ्या कुटुंबातील सदस्यांना ना मी हे श्रेय देतो.
' मी आज दिनांक 14 सप्टेंबर 2022 या दिवशी अतिशय आनंदात एनसीसी सेवेतून सेवानिवृत्त होत आहे! याबद्दल मला खूपखुशी होत आहे!💐💐
👍🏻👍🏻
======☆☆☆====
या कालावधीत मला 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी औरंगाबाद या बटालियनचे सर्व कमांडिंग ऑफिसर सह कमांडिंग ऑफिसर यांचेही मार्गदर्शन लाभलेले आहे.
तसेच एसएम, सुभेदार ,हवालदार, सीएचएम ,बीएचएम, पी आय स्टाफ, कर्मचारी वृंद ,आमचे बटालियन मधील सर्व ए एन ओ, एनसीसी अधिकारी, या सर्वांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो.
जय हिंद ! !! !!! जय भारत ! वंदे मातरम !
### $P ### $P
चला तर शाळेचा एनसीसी बद्दल पूर्व इतिहास पाहूया!
शाळेला शंभर(100) विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे
एनसीसी अभ्यासक्रम हा इयत्ता आठवी नववी या विद्यार्थ्यांसाठी असतो .हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असतो यामध्ये एक कॅम्प करावाच लागतो तेव्हा "ए 'सर्टिफिकेट परीक्षेला बसता येते ए सर्टिफिकेट चा मुलांना खूप फायदा होतो सेवेत असणाऱ्या शिक्षकांची एनसीसी साठी निवड होते एनसीसी विभाग काम पाहणाऱ्या शिक्षकांना एनसीसी ऑफिसर ए एन ओ किंवा कमांडर या नावाने ओळखले जाते. एनसीसी कमांडर होण्यासाठी पुणे येथे मुलाखत होते .यामध्ये निवड झाल्यानंतर दिल्ली हेडकॉटर मधून सिलेक्शन लेटर येते नंतर तीन महिन्यासाठी खडतर प्रशिक्षणासाठी म्हणजे सैन्य अधिकारी प्रशिक्षण हे प्रशिक्षण भारतीय सेना द्वारा दिल्या जाते हे प्रशिक्षण स्थळ नागपूर कामठी येथे आहे या प्रशिक्षणासाठी भारतातून माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक प्राध्यापक येतात राष्ट्रीय स्तरावर हे प्रशिक्षण असते .यासाठी सीनियर ज्युनिअर डिव्हिजन असतात या दोन्ही ट्रेनिंग एकाच ठिकाणी होते ऑफिसर्स ट्रेनिंग पास होणे जरुरी असते त्यामुळे आर्मी अधिकारी रँक मिळते गॅझेट ऑफिसर्स म्हणून गॅझेट मध्ये नोंद होते.
एनसीसी शाळेची शान आहे !$p I शाळेमध्ये एनसीसी (N.C.C.)== 1970 पासून चालू आहे यामध्ये पूर्वी एनसीसी अधिकारी म्हणून राहिलेले एनसीसी ऑफिसर~~~~
1) 1970 -1974
T/0 माननीय श्री एस. बी .
खडके सर
2) 1974 -1976
T/O माननीय गुरुवर्य श्री डी .जी. मुंडे सर
3) 1976 -1997
C/O माननीय गुरुवर्य
श्री एन.एस. मोटे सर
4) 1998 -2022
श्री एस. पी. सूर्यवंशी सर
1998 -2022 आज पर्यंत एकूण 25 वर्ष== पासून एनसीसी ची मोठी महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत
आहेएनसीसी चा माझा अतिशय गौरव पूर्ण कालावधी राहिला आहे .
गेवराई तालुक्यातून फक्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची गेवराई या शाळेतच! फक्त एनसीसी आहे.
एनसीसी साठी अनेक मोठमोठ्या संस्थेने प्रयत्न केला परंतु त्यांना मिळाली नाही कारण एनसीसी सरकारी जिल्हा परिषद मुलांचे शाळा ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहेत एनसीसी भारतीय सेना द्वारे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्तपणे चालविल्या जाते हे सर्व भारतीय सेना अंतर्गत असते N.C.C. शाळेची आन-बान शान आहे मी एनसीसी गान गात आहे हम सब भारतीय है।
====<<>>☆☆☆
### $P ## $P ##
N.C.C. एकता और अनुशासन
=======//=====
माझे आदरणीय सर्व माजी मुख्याध्यापक ,सर्व ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी, सहकारी शिक्षक बंधू भगिनी, वर्गमित्र ,माजी विद्यार्थी, पालक, एनसीसी छात्र, माझे मार्गदर्शक शिक्षक, मित्र वर्गमित्र ,अधिकारी वर्ग, या सर्वांना नम्र आग्रहाची विनंती आहे की 🙏🏻🙏🏻
मी दिनांक 30 सप्टेंबर 2022 या दिवशी सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्त शाळेत सेवा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11:45 वाजता राहील तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे🙏🏻🙏🏻🙏🏻
हे आग्रहाची विनंती🙏🏻🙏🏻 आपल्या आगमनाची प्रतीक्षा💐💐
$P# आपला$P#
एस. पी. सूर्यवंशी सर माध्यमिक शिक्षक
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची गेवराई तथा N. C. C .ए एन ओ(ANO) F/O
ऑफिसर 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी औरंगाबाद
## जय हिंद !##
🙏🏻JAY-HIND🙏🏻