महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

उमापुर फाट्याजवळ युवकाचा जागीच मृत्यू

उमापुर फाट्याजवळ युवकाचा जागीच मृत्यू
------------------------------------

शुभम घोडके

गेवराई ( प्रतिनिधी )बीड जिल्ह्यामध्ये वाहनांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वाहनाच्या बेदरकारपणे चालवण्याने अनेक वेळा भीषण अपघात घडतात आणि जीवितहानी देखील होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार एवढया भन्नाट वेगाने गाडी हाकतात कि, त्यावरील ताबा सुटून वाहनांना देखील अपघात झाल्याने नुकसान पोहोचते.


 सविस्तर वृत्त असे की भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीवरील  झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.  ताराचंद माणिक माळी वय 38, रा. वडगाव ढोक ता गेवराई जि. बीड असे त्या मयत दुचाकीस्वराचे नाव आहे. ही घटना 16 जुलै  रोजी सोलापूर धुळे महामार्ग उमापुर फाटा येथे घडली असुन सदर दुचाकी स्वराला स्थानिकांनी  उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे हलवले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.