महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

आगामी नगर पालिका,नगर पंचायत निवडणूका समाजवादी स्वबळावर लढवणार - जोयफ जमादार

आगामी नगर पालिका,नगर पंचायत निवडणूका समाजवादी स्वबळावर लढवणार - जोयफ जमादार
श्रीरामपूरात समाजवादीची आढावा बैठक संपन्न

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :
आगामी होऊ घातलेल्या नगर पालिका,नगर पंचायत निवडणूका सर्व ताकदीनिशी स्वबळावर लढविणार असल्याचे समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार म्हणाले.नुकताच समाजवादी पार्टीची आढावा बैठक येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस या ठिकाणी संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.या बैठकीस समाजवादी पार्टीचे वरिष्ठ प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी, यांच्यासोबत समाजवादी नेते फहाद अहमद उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.जमादार म्हणाले की, समाजवादी पार्टी हा पक्ष सर्व जाती- धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असुन उपेक्षित आणि दुर्लक्षित तथा वंचितांना नेहमी उचित न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असतो,बोटावर मोजता यावी इतके वगळता,इतर काही पक्षातील नेत्यांनी सत्ता म्हणजे आपली वडिलोपार्जित संपत्तीच असल्याचे समजून घेतले आहे,केवळ मतांसाठी गोर- गरीब उपेक्षितांचे गोड बोलुन मते मिळविणारी ही संधीसाधू सत्तापिपासू मंडळी एकदा निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात फिरकत देखील नाही तर विकासकामे होणार तरी कशी ? अशा संधीसाधू पुढाऱ्यांना शहरातील जनता (मतदार) पुरते वैतागलेले असल्याने त्यांना आपल्या न्याय हक्काचा पक्ष म्हणून समाजवादी पार्टी उचीत न्याय मिळवून देण्याकामी पुढाकार घेणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी समाजवादीचे महासचिव परवेज सिद्दीकी व समाजवादी नेते फहाद अहमद यांनी पक्षाचे ध्येय धोरणे समजावून सांगत कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजवादी पार्टी नेहमीच उभी आहे, केंद्रात मा.अखिलेशजी यादव, मुलायमसिंहजी यादव तर राज्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु असिम आझमी हे खंबीरपणे उभे आहे,पक्षाकडून जी काही मदत लागेल ती वेळोवेळी पुरवली जाईल असे आश्वासित करत,आपण कोणासही न घाबरता, न डगमगता उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या प्रश्नी सजग आणि जागरुक राहून सर्वं जाती- धर्मातील लोकांना बरोबर घेऊन कामे करावे तथा उपेक्षितांना त्यांचे योग्य न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जोयफ जमादार यांचे हात बळकट करावे असेही ते म्हणाले.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी आसिफ़ तांबोळी, अय्युब पठाण, अब्दुल सैय्यद, इमरान शेख, सुल्ताना शाह,सलीम शेख, मोहसिन क़ुरैशी, कलीम वेल्डर, अफरोज शाह, बादलसिंग जूनी, दानिश शाह, अज़हर जहागीरदार, कय्यूम शाह, अल्तमश शेख, अरबाज़ क़ुरैशी, ज़करिया सैय्यद, साद पठाण, नूर शेख, आरिफ मिर्ज़ा,ज़ाहिर जमादार, साहिल शेख, इरफान शेख, आकिब बागवान,अन्वर तांबोळी, जाविद मालिक, इमरान बाली, मुबसशिर पठाण,अली शेख, आदिल मालिक ज़ैद जमादार, मकसूद मिर्ज़ा,अमजद खान, आसिफ बाबरपुरा,क़ुर्बान शाह,आदि उपस्थित होते.