आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील सय्यद दाऊद भाई उमराव यांचे वयाच्या 104 वर्षी वृद्धाप काळाने दिनांक 14 जुलै2022 रोजी निधन झाले.जुन्या पिढीतील टेलर म्हणून त्यांनी पंचक्रोशीत आपला नाव लौकिक मिळवला होता.पुढे चालून पुढच्या पिढीत हाच पिढीजात व्यवसाय बनला.सय्यद दाऊद भाई शांत,धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाचे होते.स्वातंत्र्य पूर्व काळातील अनेक आठवणी ते सांगत असत.जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक सय्यद आयुब यांचे ते वडील होते.जनता विद्यालयाचे ग्रंथपाल,सय्यद असलम जमीर आणि पुणे औंध येथील रिसर्च सेंटरचे वैज्ञानिक,चीफ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर डॉ.सय्यद अन्वर यांचे ते आजोबा होते.तर कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या बहिणीचे ते सासरे होते. जामा मस्जिद कब्रस्थान धानोरा येथे त्यांचा त्याच दिवशी अंत्यविधी करण्यात आला.सय्यद दाऊद भाई त्यांच्या दफनविधीसाठी आष्टी तालुक्यातील तथा बीड,अहमदनगर जिल्ह्यातील अनेक आप्त,स्नेही,नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.