श्रीरामपूर शहरात थंडीतापाने नागरीक त्रस्त,
पावसाळ्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
नगरपालिकेने लिक्वीड आणी पावडर फवारणी मोहीम हाती घ्यावी - जाफर शहा
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहराच्या विविध भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत तसेच पावसाच्या पाण्याची याखड्ड्यांसह विविध ठिकाणी साठवणूक (डबके) निर्माण होऊन प्रचंड प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे,यामुळे शहरातील जुलाब,वांत्या, थंडी,तापाने अनेकांना ग्रासले आहे,प्रत्येक घरात थंडीतापाचा एकतरी रुग्ण आढळून येत असल्याने पुढे शहरात साथीचा रोग फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे, याकरीता संबंधित नगर पालिका प्रशासनाचे त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवत शहरातील प्रत्येक गल्ली- बोळात जंतुनाशक लिक्वीड फवारणी, धूर फवारणी सोबत बी सी पावडर फवारणी मोहीम तात्काळ हाती घ्यावी असे युवक काँग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष जाफर शहा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, संपूर्ण राज्यभरात श्रीरामपूर नगरपालिकेचा स्वच्छतेबाबत कोणी हात धरत नव्हते मात्र गत काही वर्षांपासून श्रीरामपूर नगर पालिकेचा ठिसाळ कारभार पाहता सर्वप्रथम नव्हेतर सर्वशेवट असा झाला असल्याचे दिसून येत असून संबंधित नगर पालिका प्रशासनाची नागरी समस्यांप्रश्नी कमालीची उदासिनता दिसून येत आहे.हा शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी उघड उघड खेळ सर्वांच्या लक्षात येत आहे,जर येत्या चार दिवसांत ( दि.२०/०७/२०२२ पर्यंत) नगर पालिका प्रशासनाने शहरातील नागरी समस्यांप्रश्नी लक्ष न दिल्यास गुरुवार दिनांक २१/०७/२०२२ पासून श्रीरामपूर नगर पालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळ शांतीच्या मार्गाने आत्मक्लेश आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असे त्यांनी या पत्रकात शेवटी नमुद केले आहे.