महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गुरुपौर्णिमेनिमित्त पाडळी येथे बोधिवृक्षाची लागवडतथागत गौतम बुद्ध यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली - सभापती उषाताई सरवदे

गुरुपौर्णिमेनिमित्त पाडळी येथे बोधिवृक्षाची लागवड

तथागत गौतम बुद्ध यांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली - सभापती उषाताई सरवदे

पाडळी प्रतिनिधी :
 पाडळी ता. शिरूर कासार येथे प्रगती सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त पंचायत समितीच्या सभापती उषाताई विजय सरवदे यांच्या हस्ते बोधिवृक्षाची लागवड करण्यात आली. हा वृक्ष ऑक्सिजन देणारा सर्वोत्तम वृक्ष असून तथागत गौतम बुद्ध यांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली असल्याचे सभापती उषाताई सरवदे यांनी यावेळी सांगितले.

या बोधिवृक्षाची लागवड कार्यक्रमाला प्रगती सेवाभावी संस्थेचे सचिव गणेश आवंतकार, विजय सरवदे समाजसेवक राम कुलथे ग्रा. प. सदस्य संभाजी पाखरे, साई इंगळे आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना सभापती सरवदे म्हणाल्या की, माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष आहे. त्यामुळे वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. अनेक गावांमध्ये शहरीकरण झालं आहे. या आधुनिक युगामध्ये उंचच्या उंच इमारती बांधण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात येते. त्यामुळे झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. परंतु झाडे हे मानवासाठी अत्यंत उपयुक्त असून त्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये डेरेदार वृक्षांचा सर्वाधिक फायदा होत असतो. वड, पिंपळ, आंबा, उंबर आणि गुलमोहर या झाडांचे अनेक गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे या झाडांपासून केवळ सावलीच मिळत नाही तर त्याचे अन्यही फायदे आहेत. यामध्ये पिंपळ हे झाडं सर्वांगाने उपयुक्त असल्याचे विज्ञानात अनेक पुरावे आहेत. बुद्ध धम्मात या वृक्षाला पवित्र स्थान आहे असे सभापती उषाताई सरवदे यांनी सांगितले. दरम्यान गणेश आवंतकर यांनी बोधिवृक्ष लागवडीचे उद्दिष्ट विशद केले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि पाडळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



३ चौकटी

बोधिवृक्षाचा इतिहास
बोधिवृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली होती.

बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प
बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज (हत्ती) हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे.[२] इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली.