हिंदी प्रमाणे साऊथची चित्रपट सृष्टी एक संधी !
हैदराबाद पार्टीत : सुपरस्टार अल्लू अर्जुनचं विश्वजीतला निमंत्रण !
----------------
व्वा.. रं पठ्ठ्या..!
बीड जिल्ह्याला गर्व वाटतोय तुझा
सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून विश्वजीतच्या पाठीवर शब्बासकीची थाप
बीड, प्रतिनिधी
हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या अभिनयाने भुरळ घालणाऱ्या रायजिंग स्टार विश्वजीतच्या अभिनयाला साऊथ इंडियन सुपर स्टार ही दाद देऊ लागल्याचं दिसत आहे. नुकतंच सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या निवासस्थानी* *आयोजित केलेल्या पार्टीत व्वा..रं.. पठ्ठ्या..असं कौतुक करून विश्वजितच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारली आहे. तसेच हिंदी प्रमाणे साऊथच्या चित्रपट सृष्टीकडे विश्वजीतने संधी म्हणून पाहावं असेही अल्लू अर्जुन यांनी यावेळी म्हटले.
दुष्काळी आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्याने आजवर विविध क्षेत्रात स्व: कर्तृत्वाने आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे रत्न या मातीतून घडले आहेत. याच रत्नाच्या खाणीतून अभिनय क्षेत्राचं शिखर गाठण्यासाठी अथक- परिश्रम व आपल्या कष्टाने 'विश्व, जीत' सर करतोय. मात्र बॉलिवूड मध्ये करिअर करणं तसं म्हणजे जिकरीचे काम असं मानलं जात असले तरी त्यातली त्यात दुष्काळी आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यासाठी तर कठीणचं...मात्र मनात इच्छा शक्ती आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल तर असाध्य ते साध्य करणं खूप सोपं आहे. हेच विश्वजीतने आपल्या अभिनयाच्या परिश्रमातून अधोरेखित केले असून जिल्ह्यातील अन्य तरुणांसाठी प्रेरक आहे.
वंचित- उपेक्षीत- कष्टकरी शोषित- पीडित बहुजनांची अस्मिता जाणारे बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांचे चिरंजीव विश्वजीत याने अल्पावधीतच बॉलिवूडवर आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप पाडली आहे. हिंदी सिनेमा सृष्टी प्रमाणे आत्ता साऊथ इंडियन चित्रपटातील सुपरस्टार असलेल्या अभिनेत्यांच्या हृदयाला ही आपल्या चंचल अभिनयानं स्पर्श करून विश्वजीतने त्यांची मने जिंकली आहेत. सुपरस्टार महेशबाबू आणि हल्ली सर्वांना "झुकेगां नहीं साला" असं वेड लावणारे सर्वांचे चाहते पुष्पा चित्रपटातील सुपरस्टार अल्लू अर्जुन यांना ही विश्वजीतच्या अभिनयानं भुरळ घातलीय.
अल्लू अर्जुन यांनी हैद्राबाद येथील आपल्या स्वतः च्या निवासस्थानी एक खास पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत विशेष करून विश्वजितला अल्लू अर्जुन यांनी निमंत्रण दिलं होतं. या पार्टीत रायजिंग स्टार विश्वजीत दाखल झाला होता. यावेळी अल्लू अर्जुन यांनी विश्वजीतची प्रशंशा करून एक उत्तम अभिनेता होण्यासाठी समर्पित अभिनयाची गरज असते. अगदी त्याप्रमाणे विश्वजीत सुद्धा त्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. हेच उत्कृष्ट अभिनेत्याचे लक्षण आहे. असं म्हणून अल्लू अर्जुनने विश्वजीतचे कौतुक करून शब्बासकीची थाप पाठीवर मारली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अभिनय क्षेत्रात उतुंग भरारी घेत असतांना साऊथ इंडियन सिनेमातील दिगग्ज अभिनेत्यांकडून त्याच कौतुक होत असल्याने जिल्ह्याला त्याचा अभिमान वाटत आहे.