जिनिअसमध्ये 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे'चा जागर
आषाढी निमित्त टाळ- मृदूंगाच्या गजरात वृक्षदिंडी आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम
बीड प्रतिनिधी
बीड शहरातील शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेच्या क्रमात अग्रगण्य असलेल्या जिनियस निग्लीश स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेमधील बाल- गोपालांनी वारकऱ्यांच्या वेशामध्ये टाळ- मृदूंगाच्या गजरात 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे' या संत. तुकाराम महाराजांच्या अभंगावर ठेका धरत वृक्षसंवर्धनाचा जागर केला. दरम्यान 'जय हरी विठ्ठलच्या गजरात यावेळी वृक्षदिंडीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी जिनिअस इंग्लिश स्कुल बापूजी नगर धानोरा रोड, बीड येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष लागवडीचा तसेच वृक्ष दिंडी आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेमध्ये भर पावसात हजेरी लावून पालकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. विध्यार्थ्यानी वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करत गळ्यात तुळशीमाळ, गोपिचंदनादि मुद्रा, हातात भगवी पताका, उभे गंध कपाळी, हाती टाळ/ वीणा/मृदुंग, डोक्यावर तुळशीपत्र घेऊन विध्यार्थ्यानी सर्वांची मने जिंकली. यावेळी विध्यार्थ्यानी, पालक, शिक्षक वृंद यांनी शाळा परिसरात वृक्षलागवड करून शाळा ते विठ्ठल मंदिर वृक्षदिंडी आणि पालखी काढून वृक्ष संवर्धन तसेच वृक्षलागवडीचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमाचे बीड शहरात आणि परिसरात कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी प्राचार्या पल्लवी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या प्रिती सवाई, मंजुषा मानूरकर, संध्या ताई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान विद्यार्थ्यांची अप्रतिम वेशभूषा साकारण्यात रोहिणी गवते, माधुरी ताई, राठोड ताई, शेळके ताई यांनी परिश्रम घेतले.