पाणी पातळी वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनाकडून इशारा
-------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच दि. 15-07-2022
वेळ: 07.00 Hrs
आज दि. 15-07-2022 रोजी आपेगाव उच्च पातळी बंधारा 92.41% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक बघता आज सकाळी10.00 वाजता बंधाऱ्याचे एक द्वार उघडून नदीपात्रात साधारणतः 6558 क्यूसेक विसर्ग सोडण्याचे नियोजित आहे, येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते. तरी सदर कालावधीत कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा करिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.