संत गजानन महाराज पालखी गेवराईत दाखल
--------------------------------
शुभम घोडके
गेवराई ( प्रतिनिधी) कोरोना सारख्या महामारीत तब्बल दोन वर्षात येऊ शकले नाही व पंढरपूर वारी यामध्ये खंड पडला होता यावर्षी श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर वारी करून परतीच्या प्रवासात संत गजानन महाराज पालखी गेवराईत दाखल झाली असून शहरातील मोंढा नाका पंचायत समिती कॉर्नर जुने बस स्टॅन्ड मार्गे जिल्हा परिषद कन्या प्रशालेत येऊन मुक्काम होणार या मार्गावरील भाविक भक्तांनी सडा, रांगोळी काढली असून श्री च्या पालखीचे त्यांनी स्वागत केले. टाळमृदंगाच्या गजरात गजानन भक्तीचा नाद दुमदुमत आहे यामुळे भाविक भक्तात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.