गेवराई तालुक्यात वीस तास संततधार...!
गेवराई प्रतिनिधी : तालुक्यातील विविध विविध भागात गेल्या आठवडाभरापासून
पावसाची रिपरिप सुरू असून, मंगळवार ता. 12 रोजी रात्री सहा वाजल्यापासून ते दुसर्या दिवशी चार पाच वाजेपर्यंत संततधार सुरू होती. त्यामुळे, परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे.
आभाळ भरून आल्याने, पाच दिवस झाले सूर्य दर्शन होऊ शकले नाही. दरम्यान,
गेवराई तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने एकीकडे पिकांना फायदा होत असला तरी सूर्य दर्शन नसल्याने पिकांना पोषक वातावरण नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पिकांची वाढ खुंटली असून, रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. नदी नाले वाहू लागले आहेत. गाव तलाव, पाझर तलावात पाणी आले आहे.