नगरपालिका निवडणुकीला निवडणूक आयोगाची स्थगिती
----------------------------------------
बीड (प्रतिनिधी) राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज स्थगित केला आहे .तश्या आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांना राज्यनिवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी आज दि १४ जूलै २०२२ रोजी पाठवले असल्याने आता बीड जिल्हासह अन्य जिल्हयातल्या नगरपालिका निवडणूक रद्द झाल्या आहेत
राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै रोजी राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या होत्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा पासून निवडणूक निकालाच्या तारखांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता .परंतु ओबेसी च्या राजकीय आरक्षण वरून न्यायालयात सुनावणी सुरु आहे . याची पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे तत् पूर्वी राज्य निवडणूक आयोगाने आज घोषित केलेल्या निवडणुकांना स्थगित केल्याचे सांगितले तश्या आशयाचे पत्र आयोगाने जिल्हाधिकारी यांच्या नावे पाठवले आहे
राज्य निवडणूक आयागाचे दि. आठ जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगर पंचायतींच्या सदस्या पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 दिला होता. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 ची सुनावणी दि. 12 जुलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागसप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने या संर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे.
सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की, आयागाचे 8 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्व्ये देण्यात आलेला राज्यातील 92 नगर परिषदा व चार नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 याद्वारे स्थगित करण्यात येत आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही.