तुळजा भवानी इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी महोत्सव उत्साहात संपन्न
गेवराई (प्रतिनिधी) शहरातील तुळजा भवानी इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत सोपानदेव, जनाबाई, मुक्ताबाई, वारकरी यांची वेशभूषा साकारून सहभागी झाले होते. विठुरायाच्या गजरात विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी रिंगण करून पाऊले खेळली व मुलींनी फुगडी खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ठीक ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. विठुरायाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता . दिंडी तहसील रोड मार्गे तापडिया सिटी सेंटर, शास्त्री चौक मार्गे ,. दाभाडे गल्ली, संभाजी महाराज चौक, रंगार चौक मार्गे संपन्न झाली. यावेळी प्रिन्सिपल कोकाटे सर, वाईस प्रिन्सिपल गीता मिस आरती मिस, छाया मिस अर्चना मिस,मदने मिस, अर्चना मिस, दत्ता सर,आदिनाथ सर , घुंबार्डे मावशी या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.