बीड जिल्हा समता परिषदेच्या वतीने मा.छगनरावजी भुजबळ साहेबांचा सत्कार
--------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखालील लढ्यामुळे आणि त्यांच्या समर्पित आयोगा संदर्भातील व न्यायालयातील पाठपुराव्यामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. याबद्दल नाशिक येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करून राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजाच्यावतीने आभार व्यक्त करताना समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत दिसत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर यांची उपस्थिती होती.