मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर थांबा : ॲड श्रीनिवास बेदरे
-----------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांना मोदी सरकारच्या हातातील बाहुले असलेल्या ईडी विभागाने नोटीस बजावली असून त्यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने संपूर्ण देशात कॉंग्रेस पार्टीकडून मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज मोदी सरकार विरोधात विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे महाराष्ट्र काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले
यावेळी बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे,आमदार सुरेश वरपुडकर,मा.आ कल्याण काळे,व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.