गेवराई जवळ रांजणी येथे अपघात झाल्याने एकजण गंभिर जखमी
गेवराई (प्रतिनिधी) रा.माळापुरी ता.जि.बीड येथील रहिवासी असलेले मतीनखा शहबाजखा पठाण हे माळापुरी येथुन राष्ट्रीय महामार्ग क्र 52 ने गेवराई कडे नविन होंडाशाहिन मोटारसायकल वर येत
असतांना महिंद्र कंपणीच्या 16 टायर टॅंकर ने पाठी मागुन जोराची धडक दिल्याने अपघातात मतिनखा शहबाजखा पठाण हे रक्ताने बांबळ होवुन जखमी झाले.
सविस्तर असे की दि.17 जुलै 2022 रविवार रोजी मतीनखाँन शहबाजखा पठाण वय 55 , व्यवसाय मजुरी ( मिस्त्री काम ) रा . माळापुरी ता . जि . बीड हे आपल्या गावाकडुन नविन घेतलेली होंडाशाहिन मोटारसायकल क्रमांक एम.एच. 23 बी . ई . 7231 अशी असुन या वाहणावर हे कामानिमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र.52 ने गेवराई कडे येत असतांना बीड - जालना रोड
रांजणी येथे महिंद्रा कंपनिच्या 16 टायर टँकर क्रमांक जी . जे . 12 बी . झेड . 5858 असुन या वाहणाने पाठीमागुन जोराची धडक दिली आहे. या अपघातात मतिनखा शहबाजखा पठाण हे गंभिर जखमी झाले आहे. डोक्यावर मोठी दुखापत झाल्याने त्यांच्यावर काकु नाना हाॅस्पिटल बीड येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. व सदरील महिंद्रा कंपणी च्या 16 टायर वाहण चालकावर गेवराई पोलिस स्टेशन येथे कलम 279, 337, 338, 427 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास अशोक शेळके हे करत आहे.