कर्तव्य बजावत असताना गोरख मोहन जंगले यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू.
---------------------------------------
शुभम घोडके/गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी) नगर परिषदेत पाणीपुरवठा कर्मचारी कार्यरत असणारे गोरख मोहनराव जंगले ( 53 ) हे कर्तव्य बजावत असताना, ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते शिवाजी नगर गेवराई येथील रहिवासी होते.
गोरख मोहनराव जंगले हे गेवराई शहरातील फिल्टर पाणी टाकी येथे कर्तव्य बजावत असताना, त्यांना तिव्र ह्रदय विकाराचा झटका आला. त्यात कोसळले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल केले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. जंगले यांच्या पश्चात पत्नी, मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष हरपल्याने जंगले कुटूंब पुरते खचले आहे.