संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखी गुरूवार २१ जुलै रोजी गेवराईत मुक्कामी
शुभम घोडके/गेवराई
गेवराई : (प्रतिनिधी) विदर्भातील पंढरी समजल्या जाणा-या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा तब्बल दोन वर्ष कोरोना प्रादुर्भाव मुळे येवु शकली नाही.मात्र या वर्षी श्रीची पालखी पंढरपुर वारी परतुन २१ जुलै गुरुवार रोजी गेवराईत मुक्कामी येत असुन पालखी दर्शनाचा लाभ भाविक भक्तीनी घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
विदर्भाची पंढरी समजल्या जाणा-या श्री संत गजानन महाराज यांची पालखी कोरोना प्रादुर्भाव मुळे तब्बल दोन वर्षां येवु शकली नाही.मात्र या वर्षी श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपुर वारी करून परतीच्या प्रवासात असुन बुधवार रोजी बीड मुक्कामी थांबुन गुरूवार रोजी गेवराई येथे सायंकाळी ५ च्या सुमारास गेवराई नगरीत दाखल होणार असुन पालखी मार्गात या वर्षी बदल करण्यात आला असुन पुर्वीच्या पालखी मार्गावरून न जाता शहरातील मोंढा नाका, पंचायत समिती काॅनर्र,जुने बसस्थानक मार्गे जिल्हा परिषद कन्या प्रशालेत येवुन मुक्काम राहणार आहे. तरी या पालखी दर्शनाचा लाभ भावीक भक्तीनी घ्यावा असे आवाहन संस्थान वतीने करण्यात आले आहे.