आष्टी प्रतिनिधी
रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत हजारो प्रेक्षकांपुढे वात्रटिकांची जबरदस्त आतषबाजी करणारा कवी,वात्रटिकाकार मधुचंद्र राऊत यांना आजारपणामुळे मेंदूच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.गेली अनेक वर्ष त्यांचे फिरणे,घर आणि शाळा एवढ्यापुरतेच मर्यादित आहे.उगवत्या सूर्याला नमस्कार करणारांनी पाठ फिरवली. तरी मधुचंद्र ते जुने दिवस विसरलेले नाहीत.आजही त्यांना ते सर्व क्षण याद आहेत.त्यांचा मधुचंद्राचा ठसका हा वात्रटिकासंग्रह पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाला. त्या संग्रहाला कविवर्य फ.मु. शिंदे यांची पाठराखण आहे.मधुचंद्र राऊत आता कुठल्याही कविसंमेलनाला जाऊ शकत नाहीत.म्हणून त्यांच्याच घरी रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत मधुचंद्राचा सत्कार आणि खुले कवी संमेलन आयोजित केले आहे. अहमदनगरचे प्रसिद्ध साहित्यिक,कवी संजय बोरुडे आणि कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी मधुचंद्रचे चहाते डॉ.राजेंद्र पवार,शिवाजी चाळक,जयसिंगराव गाडेकर,जनार्धन देवरे,शकील शेख,प्रभाकर साळेगावकर,क्रांती राऊत यांच्या उपस्थिती एका आजारातील कवीला,ज्ञानदीप कॉलनी,केरूळ रोड,कडा ता.आष्टी जि. बीड येथे आनंदाचे डोही आनंद तरंग असा आनंददायी भेटीस योग जुळवून आणला आहे.कुठलेही मानधन न घेता अनेक कवी 7066301946 या मोबाईल नंबर वर लिंक भरून सहभाग नोंदवित आहेत.सत्कार आणि कविसंमेलनात कवयित्री संगीता होळकर..औटे,वि.भा.साळुंके,संतोष दाणी, हरीश हातवटे,नागेश शेलार,दिनेश पोकळे, राजेंद्र लाड,अभय शिंदे,इंद्रजीत झांजे,नजमा शेख,अशोक उडाणे,युवराज वायभासे,सुनील शेळके,राम हंबर्डे हे कवी सहभागी होणार आहेत.असे साहित्याक्षरचे डॉ.संजय बोरुडे यांनी सांगितले.