पाटणी विद्यालयाच्या चेअरमनपदी
भरत कुंकुलोळ यांची नियुक्ती
श्रीरामपूर (शौकत भाई शेख) : हिंद सेवा मंडळाच्या शां.ज. पाटणी विद्यालयाच्या चेअरमनपदी येथील नक्षत्र कलेक्शनचे संचालक, शहरातील प्रथितयश व्यापारी व इंडियन रेड क्रॉस चे माहिती अधिकारी भरत बुधमल कुंकुलोळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मानद सचिव संजय जोशी यांनी दिली.
भरत कुंकुलोळ हे २५ वर्षापासून सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक,राष्ट्रीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देत आहेत.श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीत कुंकुलोळ परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी ,युवक बिरादरी, राजाराम तरुण मंडळ,बुद्धिबळ संघटना,अंधश्रध्दा निर्मूलन समिती,आदी संस्थांवर भरत कुंकुलोळ पदाधिकारी म्हणून सेवाकार्य करत आहेत,हिद सेवा मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी मला दिलेली संधीचे सोने करणार असून विद्यालयाचा गुणात्मक व भौतिक विकास करण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे नूतन चेअरमन भरत कुंकुलोळ यांनी सांगितले.
भरत कुंकुलोळ यांच्या निवडीचे येथील उप विभागीय (प्रांत) अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील,सचिव संजय जोशी,रणजित श्रीगोड, अशोक उपाध्ये, नूतन चेअरमन संजय छल्लारे,अनिल देशपांडे, सुनील साळवे,श्रावण भोसले, प्रवीण साळवे,रमेश लोढा,सुनील गुप्ता,अरुण कटारे,आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.