गेवराईत संभाजी महाराजांच्या जयंतीची जोरदार तयारी
जयंतीच्या अध्यक्षपदी विजय जाधव
गेवराई (प्रतिनिधी):- गेवराई शहरातील धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची सार्वजनिक जयंती दरवर्षी विविध समाजपयोगी कार्यक्रम हाती घेऊन मोठ्या उत्साहात संभाजी चौकात साजरी केली जात आहे.मागिल दोन वर्षांत या जयंतीला कोरानामुळे अडथळा निर्माण झाला होता.माञ कोरोना निर्बंध शिथील करण्यात आल्याने यंदा १४ मे रोजी मोठ्या धुमधडाक्यात संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा संकल्प गेवराईतील संभाजी चौक येथील तरुणांनी घेतला आहे.विशेष म्हणजे आजवर संभाजी चौकातील तरुणांनी कसल्याही प्रकारे व्यापा-याकडे वर्गणी न मागता ही जंयती साजरी करत आहे.धर्मवीर संभाजीराजे महाराज या सार्वजनिक जंयतीच्या अध्यक्षपदी विजय जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.दरम्यान जयंतीची संभाची चौक व तहसील परिसरात येथील तरुणांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.बुधवारी राञी शोकडो सर्वपक्षीय तरुणांची बैठक येथील संत तुकाराम महाराज मंदिरात पार पडली.विविध पक्षांचे झेंडे व राजकारण बाजूला ठेऊन ही संभाजी चौकातील शोकडो तरुण दरवर्षी मोठ्या उत्साहात ही जंयती साजरी करत आसल्याची ओळख संपूर्ण गेवराई तालुक्यात आजवर झाली आहे.
यंदा धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची जंयती येत्या १४ मे रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्याचा संकल्प संभाजी चौकातील शोकडो तरुणांनी केला आहे.यानिमित्त बुधवारी गेवराई शहरातील संभाजी चौक येथील संत तुकाराम महाराज मंदिरात दिपक (तात्या) आतकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक घेण्यात आली.यावेळी सतिष दाभाडे,विष्णुपंत आतकरे,संजय ढोणे,दिनेश घोडके,सचिन दाभाडे,विलास ठाकूर,दत्ता दाभाडे,एकनाथ लाड,गेवराई तालुका पञकार संघाचे उपाध्यक्ष कैलास हादगुले आदिच्या उपस्थितीत हि बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते विजय जाधव यांची जयंतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकरणीत वैभव दाभाडे,विशाल ठाकूर,गणेश कादे,मुजायत पठाण यांच्या देखील विविध पदांवर निवडी करण्यात आल्या आहेत.दरवर्षी शिवसेना गेवराई उपतालुका प्रमुख कै.जालिंदर काळे यांचे मोठे मार्गदर्शन राहिले माञ त्यांचे निधन झाल्याने या बैठकीत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येऊन हि बैठक यंदा युवा कार्यकर्ते दिपक (तात्या) आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा घेण्यात आली.
संभाजी महाराज यांच्या जयंतीची संभाजी चौक व तहसील परिसरात जोरदार धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची सध्या तयारी शोकडो तरुणांनी सुरु केली आहे.भव्य रक्तदान शिबीर,रुग्णांना फळ वाटप,गरिब विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप,अन्नदान,भजन,पोवाडे,तसेच १४ मे रोजी सकाळी गढी ते गेवराई भव्य मशाल ज्योत पदयाञा व सांयकाळी संभाजी महाराज यांच्या जंयतीची जोरदार सध्या तयारी सुरु केली आहे.यावेळी करण जाधव,मुन्ना कोकाट,शिवनाथ परळकर,अभिषेक दाभाडे,संजय दाभाडे,गोविंद दाभाडे,रवि दाभाडे,बाळासाहेब दाभाडे,भागवत परळकर, दाभाडे,आंनद दाभाडे,हेमंत दाभाडे,सचिन दाभाडे,विकास कोकाटे,भुषण सोलाट,महादेव खडके,महादेव काशीद,दिपक हादगुले,बाबा वाघमारे,शिवाजी वाघमारे,साहिल देशमुख,सुरज जाधव,संग्राम पंडित,शंकर ठाकूर,सागर ठाकुर,शिवा ठाकूर,मनोज वादे,शरद वादे,प्रविण परिहार,अजय काळे,रवि गोरे,सचिन नाईक,पवन कोकाट,मोहन आर्दड,विठ्ठल धापसे,संभाजी वादे,कृष्णा हादगुले,यश जाधव सह शंभूप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.
