आष्टी प्रतिनिधी
पदवी हा एक विशेष टप्पा आहे. बेरोजगारीच्या युगात,रोजगारी साठी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. पुढील काळात सचोटी,प्रामाणिकपणा,चिकाटी ही महत्त्वाची आहे.पदवीधरांनी स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करावे.असे किशोर नाना हंबर्डे म्हणाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद आणि आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने, हंबर्डे महाविद्यालयात पदवीदान समारंभात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,प्रा.महेश चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.अमोल गरडकर यांनी स्वागत गीत गायिले.विद्यापीठ गीता नंतर प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉ.हरिदास विधाते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात जाऊन पदवी घेणे सोयीचे होत नाही.विद्यापीठात डॉक्टरेट विद्यार्थ्यांना पदवी समारंभात पदवीदान करण्यात येते. ज्ञान संपादन करून कलेक्टर होता येते. देशात,प्रदेशात या पदवीचा उपयोग करून घेता येतो.देशाची आणि स्वतःची मान उंचावली जाते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते तब्बल 51 पदवीधरांना समारंभपूर्वक, सन्मानपूर्वक पदवीदान करण्यात आले.डॉ.सुहास गोपने यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.बाबासाहेब मुटकुळे यांनी आभार मानले.राष्ट्रगीताने पदवीदान समारंभची सांगता झाली.
