गेवराईच्या सावता नगर भागात
भव्य रक्तदान शिबिर
गेवराई( प्रतिनिधी) गेवराई शहरातील सावता नगर भागात सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यां महात्मा फुले युवा मंच च्या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे
रक्तदान हेच जीवनदान असे समजले जाते देशासह राज्यांमध्ये कोरोणा सारख्या महामारीचे संकट असल्यामुळे विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा साठा कमी पडत असल्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून महामानवाच्या संयुक्त जयंती निमित्त सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले युवा मंचच्या माध्यमातून सकाळी 11 ते दुपारी3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून
या होणार्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन महात्मा फुले युवा मंच च्या वतीने करण्यात आले आहे
