आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली, सचिव अतुल शेठ मेहेर,महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष,पत्रकार दत्ता काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,माजी विद्यार्थी संस्था अध्यक्ष डॉ. सखाराम वांढरे यांनी आवाहन केले आहे.
