महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

प्रचंड परिश्रम घेण्याची ताकत हंबर्डे महविद्यालयाच्या संस्थाचालकात आहे.. दत्ता काकडे

प्रचंड परिश्रम घेण्याची ताकत हंबर्डे महविद्यालयाच्या संस्थाचालकात आहे..  दत्ता काकडे    

आष्टी प्रतिनिधी 
हंबर्डे महाविद्यालयात आमची जडणघडण झाली.संकटात सामोरे जाण्याची हिंमत इथेच मिळाली.भाकरीची भ्रांत होती,त्यावेळी गोरगरिबांची मुले इथे मायेचा ओलावा घेऊन शिकली.महाविद्यालयाच्या विविध उपक्रमातून सामाजिक कार्य केल्यानेच थोर समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार
यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयाचा कायापालट पाहताना आज असे वाटते की, प्रचंड परिश्रम घेण्याची ताकद हंबर्डे महाविद्यालयाच्या संस्थाचालकात आहे.असे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केले.महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.माजी विद्यार्थी न्यायाधीश भालचंद्र झेंडे,एडवोकेट गौतम निकाळजे,नागेश वाल्हेकर,सुनील शेळके,अनिल जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.संतोष वनगुजरे यांच्या फिजिकल अंड सोशल विटल इशू या पुस्तकाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,न्यायाधीश भालचंद्र झेंडे,यांच्या सह सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी अध्यक्षीय समारोपात किशोर नाना हंबर्डे म्हणाले,या महाविद्यालयाने मान्यवर मंत्री, कलेक्टर,महाराष्ट्र केसरी,न्यायाधीश,विचारवंत,ते हॉटेल मालक,निष्ठावंत कामगार घडवले.ज्यांनी बोर्डिंग मध्ये राहून शिक्षण घेतले.अशा विद्यार्थ्यांचे हे महाविद्यालय आहे.हे आपलेच महाविद्या