आष्टी प्रतिनिधी
महात्म्यांनी नेहमीच गरीब दुबळ्या सामान्य माणसांचा विचार केला.जिथे जिथे अन्याय, अत्याचार होईल, तिथे तिथे स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि चांगल्या आचारांनी, विरोधाला नतमस्तक करण्याची ताकत त्यांनी निर्माण केली.सर्व संत, विचारवंत जगाच्या कल्याणासाठीच झिजले. आज भगवान महावीर,मोहम्मद पैगंबर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चांगल्या विचारांचा खजिना जगासाठी साठी खुला केला.असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रा.डॉ. भगवान वाघमारे त्यांनी व्याख्यानातून प्रकाश टाकला.उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.डॉ.सुहास गोपने यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.प्रा.जे.एम.पठाण यांनी आभार मानले.
