महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

युवकांनी या शिबिरातून प्रेरणा घेऊन आपले गाव समृध्द करावे- सोपानराव निंबोरे

युवकांनी या शिबिरातून प्रेरणा घेऊन आपले गाव समृध्द करावे- सोपानराव निंबोरे

आष्टी प्रतिनिधी:
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालय, आष्टीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांचे विशेष शिबिर दि. २१ ते २७  मार्च २०२२ मध्ये कासेवाडीत संस्था अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतूलशेठ मेहेर, माजी पंचायत समिती उपसभापती अजिनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले त्यावेळी  शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना प्राचार्य डॉ सोपानराव निंबोरे यांनी वरील मत व्यक्त केले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की कासेवाडीने पाणि फाऊंडेशनच्या माध्यमातून शॉट कॅप स्पर्धा, समृध्द ग्राम स्पर्धा व विविध जल-जंगल-मृद संवर्धन कामासाठी विविध उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण केले व काही चालू आहेत. गावाला कशा पध्दतीने समृध्द करता येईल यासाठी कासेवाडीतील सर्व जन सुदाम बापूंच्या मार्गदर्शनाखाली श्रम घेत असताता. हे चित्र निश्चितच प्रेरणादायी आहे सर्व तरूणानी या शिबिरातून ही प्रेरणा व गावविकासाठी विविध आयामाचा अभ्यास या शिबिरात केला आहे तेव्हा आता या कार्याला आपल्या गावात घेऊन जाऊन देशाला समृध्द करण्यासाठी योगदान द्या असे आवाहन केले तर कार्यक्रम अधिकारी रवी सातभाई यांनी सात दिवसांत झालेल्या कार्याचा आढावा आपल्या प्रस्तावनेत सांगितला. सोमवारी प्रा. भारूडकर व डॉ. वाघमारे यांनी समृध्द ग्राम निर्मितीसाठी ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था यांची भूमीका, प्रा. रवी सातभाई यांनी समृध्द ग्राम, श्री. तान्हाजी रेडेकर यांनी दुग्ध उत्पादन व‌ पशू संवर्धन, डॉ. अभय शिंदे यांनी व्यसनमुक्ती, डॉ. मंगेश शिरसाठ यांनी ऑनलाईन बँकिंग, डॉ. सुहास गोपणे यांनी जलसंवर्धनात युवकांची भूमिका आदी विविध विषय सात दिवस मांडले तर युवकांनी प्रत्यक्ष कार्य करून श्रमसंस्कार करून घेतली. या सात दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यासाठी कासेवाडीचे सरपंच सौ‌. कांताबाई पांनसाडे, उपसरपंच मारूती पवार, सुदामबापू सानप, सुनिल सानप,  संदिप पानसांडे, बाळासाहेब सानप, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब काळे, व सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य डॉ बाबासाहेब मुटकुळे, उपप्राचार्य अविनाश कंदले, पर्यवेक्षक अशोक भोगाडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी रवी सातभाई, सुहास गोपणे, महेंद्र वैरागे, प्रा. शुभांगी खुडे, प्रा. संतोष वनगुजरे, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, प्रा. निवृत्ती नानवटे व सर्व स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.