मंगलनाथ परिवाराच्या वतिने जेष्ठ कलावंत उत्तम(नाना)मोटे यां चा सत्कार
गेवराई प्रतिनिधी
गेवराई येथील जेष्ठ कलावंत उत्तम नाना मोटे यांची महाराष्ट्र शासनाच्या वयोवृद्ध कलावंत निवड समीतीवर नियुक्ती झाली, त्यानिमीत्ताने मंगलनाथ बँकेच्या वतिने अध्यक्ष केशवराव पंडित यांनी मोटे नानांच्या सत्काराचे आयोजन केले होते. ख-या कलावंतांना न्याय देण्याचे काम या समीतीच्या माध्यमातुन माझ्या हाताने होईल अशी ग्वाही या सत्काराला उत्तर देताना उत्तम नाना मोटे यांनी दिली.
अतिशय कौटुंबीक अशा वातावरणात सत्कारप्रसंगी उत्तम नाना मोटे भावुक झाले होते. गेवराईकरांचे व मंगलनाथ परिवाराचे हे सत्काराचे ऋण कदापी विसरणार नाही असे भावेनोद्गार त्यांनी याप्रंसंगी व्यक्त केले.प्रास्ताविकात मंगलनाथ बँकेचा सामाजीक दृष्टिकोन मांडुन बँकेच्या कारभारविष्यी अध्यक्ष केशवराव पंडित यांनी माहीती दिली. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचे संपुर्ण श्रेय नाट्यअभिनेते लेखक प्रशांत रुईकर यांचे असल्याचे ते म्हणाले. गेवराईच्या सामाजीक चळवळीशी मंगलनाथ परिवाराची एक विशिष्ट नाळ जोडलेली आहे व ती कायम राहील असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रमुख उपस्थीती म्हणून शिवसेना माजी तालुकाप्रमुख,राजेंद्रदादा बेदरे,नाट्यकलावंत प्रशांत रुईकर,सामाजीक कार्यकार्ते रमेश नानालाड,पत्रकार अंकुशदादा पाचपुते, रामशेठ वाघमारे, गणेश लाड, व्यापारी अमीत शिखरे, इस्टेट एजंट मुकूंद टाक ,कदम दादा व मंगलनाथ परिवाराचे सर्व सदस्य उपस्थीत होते.
