महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

समृध्द ग्राम निर्मितीसाठी युवा विशेष शिबिर उद्घाटन समारंभ संपन्न

समृध्द ग्राम निर्मितीसाठी युवा विशेष शिबिर उद्घाटन समारंभ संपन्न

आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालय, आष्टी च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांचे विशेष सात दिवसीय शिबिर समृद्ध ग्राम निर्मितीसाठी युवाचे उद्घाटन समारंभ संस्था अध्यक्ष मा. किशोर हंबर्डे व सचिव अतूलशेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटामाटात कासेवाडी या दत्तक गावात संपन्न झाले. 
कार्यक्रम अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपानराव निंबोरे हे होते तर उद्दघाटक म्हणून कासेवाडीतील जेष्ठ नागरिक मा. सुदामा बापू सानप हे होते. यावेळेस जलदूत सुनिल सानप, जि. प. प्राथमिक शाळा कासेवाडीचे मुख्याध्यापक आप्पासाहेब काळे, महाविद्यालयांचे उपप्राचार्य डॉ बाबासाहेब मुटकुळे, प्रा. अविनाश कंदले, पर्यवेक्षक अशोक भोगाडे याची विशेष उपस्थितीती होती. यावेळी कार्यक्रम अधिकारी रवी सातभाई यांनी शिबिराची पार्श्वभूमी सांगून, गावाच्या योगदानाची माहिती दिली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथिप्रमाणे जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रम अधिकारी सुहास गोपणे यांनी प्रास्ताविक करून सातदिवसीय कार्याची रूपरेषा सांगितली.  तर सुनिलजी सानप यांनी गावाच्या व‌ महाविद्यालयांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांवर व महाविद्यालयांच्या माध्यमातून तिनं वर्षात गावाने काय साध्य केले याची माहिती दिली, उपप्राचार्य डॉ बाबासाहेब मुटकुळे यांनी पुर्विची कासेवाडी व आताची समृध्द कासेवाडी यावर प्रकाश टाकला तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ सोपानराव निंबोरे यांनी ससा व कासवाच्या सहकार्याने गावाचा विकास शक्य आहे, त्याप्रमाणे महाविद्यालय व कासेवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गावाचा विकास साध्य झाला व होत आहे असे मत व्यक्त केले. तर स्वयंसेवक विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध राहून, गावातील ग्रामस्थांना आदर्श माणून कार्य करा व शिबिर यशस्वी करा असे आवाहन केले. यावेळी सुत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी रवी सातभाई यांनी केले तर आभार महेंद्र वैरागे यांनी व्यक्त केले.‌