महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हंबर्डे महाविद्यालयांच्या रासेयोच्या समृद्ध ग्राम निर्मितीसाठी युवा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्या उद्घाटन

हंबर्डे महाविद्यालयांच्या रासेयोच्या समृद्ध ग्राम निर्मितीसाठी युवा सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्या उद्घाटन

आष्टी प्रतिनिधी:
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲड.‌बी.‌डी. हंबर्डे महाविद्यालय, आष्टीच्या राष्ट्रीय सेवा योजना एककांच्या समृद्ध ग्राम निर्मितीसाठी युवा या सात दिवसीय शिबिराचे उद्या मा. तहसिलदार विनोद गुड्डमवार यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजि. किशोर (नाना) हंबर्डे हे राहणार आहेत. यावेळी नायब तहसीलदार मा. बाळदत्त मोरे, पंचायत समिती माजी उपसभापती अजिनाथ सानप, संस्था सचिव मा.‌अतूलशेठ मेहेर, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. पंडीत खाकरे, ग्रामसेवक पालके साहेब, ब्रम्हगाव, कासेवाडी, आंबेवाडी सरपंच सौ‌ . कांताबाई पांनसाडे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी दिली.‌
तर शिबिरात सात दिवस विविध उपक्रम राबवून युवकांना ग्रामविकासाठी द्यावयाच्या योगदानाची व ग्रामविकासासठी आवश्यक घटकांचे ज्ञान व कौशल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
महाविद्यालयांच्या रासेयो एककांचे १२५ स्वयंसेवक या शिबिरात सहभागी होणार असून सात दिवस समृध्द ग्राम निर्मितीसाठी ग्रामपंचायत व स्थान प्रशासनाची भूमिका, समृध्द ग्राम,  दुग्ध उत्पादन व‌ पशू पालन, ग्रामस्थ व स्वयंसेवक आरोग्य तपासणी, ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था, शासकीय योजना व आपण, सेंद्रिय शेती, जलसंवर्धनात युवकांची भूमिका, व्यसनमुक्ती व ऑनलाईन बँकिंग ह्या विषयावर तज्ञ मार्गदर्शक ग्रामस्थ व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात स्वयंसेवकांना आरोग्यपूर्ण व समाजसेवेत जिवन कसे जगायचे याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. 
शिबिर यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य डॉ बाबासाहेब मुटकुळे, प्रा. अविनाश कंदले,   रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रवी सातभाई, डॉ. सुहास गोपणे, प्रा. महेंद्र वैरागे, प्रा. शुभांगी खुडे, सुनिल सानप व कासेवाडीतील सर्व विद्यार्थि स्वयंसेवक परीश्रम घेत आहेत.