चंपावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय वाघमारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव
बीड (भागवत वैद्य )बीड जिल्ह्यात चंपावती सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून व कोरोना काळात प्रामाणिकपणे कसलीही अपेक्षा न करता समाजसेवा करत राहणे व मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे वृत्त काहीजण कायम ठेवून आपले कर्तव्य समजून समाजासाठी निस्वार्थी वृत्तीने काम करतात .त्यात बीड जिल्ह्यात धनंजय वाघमारे हे आपल्यासमोर उदाहरण आहे .धनंजय हे चंपावती सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरिबांचा अनाथांचा वंचितांचा शोषितांचा आधार बनवून त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन धनसंपत्ती तयार करणारे धनंजय यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री भगतसिंह कोष्यारी यांनी राजभवनावर बोलावून त्यांना शुभेच्छा व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. चंपावती सामाजिक प्रतिष्ठान बीड या संस्थेचे अध्यक्ष धनंजय धर्मराज वाघमारे व सदस्य यांनी पूर्ण कोरोणा संक्रमणाच्या काळात व्यापक सामाजिक हिताचे कार्य केल्याने याची दखल प्रशासनाने घेतली व त्याची माहिती राज्यपाल विभागाला दिली होती. त्या अनुषंगाने हे कार्य राज्यपाल त्यांच्यासमोर गेल्यानंतर त्यांनी आनंदी होऊन चंपवती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मानपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. चंपावती सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले गोरगरीब मुजरा साठी जेवणाची सोय ,अन्नधान्य वाटप करणे, पोलीस बांधवांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना चहा व नाश्त्याची सोय करून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जनजागृतीची कार्य करणे, हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. व्यसनमुक्ती ,जनजागृतीचे कार्य, रक्तदान शिबिराचे आयोजन ,संकट आले तर समाज बांधवांना मदत करणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेणे व इतर वेळी आपण करत असलेल्या समाजकार्याबद्दल प्रस्थान व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो .आणि हे उपक्रम प्रशंसनीय आहे. चंपावती सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्य स्वखर्चाने कामे करीत आहे. ही एक विशेष कौतुकास्पद बाब आहे .असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे व असे की ,सामाजिक कार्य करत रहा. कुठल्याही सहकार्याची गरज भासल्यास मी स्वतःहून चंपावती प्रतिष्ठानला मदत करेल .असेही राज्यपालांनी धनंजय वाघमारे यांना सूचित केले. अशा प्रकारच्या सामाजिक कार्य करणाऱ्या प्रतिष्ठानच्या धनंजय वाघमारे व त्यांच्या प्रतिष्ठानला मराठवाड्यातील प्रथम सन्मान मिळाल्याचे समजते. राज्यपालांनी दिलेल्या सन्मान त्यांनी केलेल्या गोरगरीब बद्दल वाघमारे व त्यांचे बंधू डॉक्टर धनराज वाघमारे व सर्व प्रतिष्ठान चे सदस्य अनेकांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
