आष्टी प्रतिनिधी आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयातील कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचा दिनांक14 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा झाला. आजवर त्यांची 12 पुस्तके प्रकाशित झाली असून 5 पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे.हंबर्डे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट बी.डी.हंबर्डे भाऊ,गानकोकिळा लता मंगेशकर,अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर पुस्तक लेखनाचा त्यांचा मानस आहे. हंबर्डे महाविद्यालयाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.याचे औचित्य लक्षात घेऊन एडवोकेट बी.डी. हंबर्डे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे संपादन ते करणार आहेत.सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या बाल कविता वाचून कौतुक केले होते.लता मंगेशकर यांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले,ऐकले होते.पंडित हृदयनाथ मंगेशकर हे कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कवितांचे चाहते आहेत.झिंदाबाद...मुर्दाबाद हे पुस्तक वाचून त्यांनी तब्बल आठ पानी अभिप्राय लिहून पाठवला आहे.औरंगाबाद येथील कार्यक्रमात प्रत्यक्ष व्यासपीठावर बोलावून या कवीचे त्यांनी कौतुक केले.तीन पुस्तकाशिवाय दोन कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणी आणि सुभेदाराच्या सुनेचा आदर सन्मान केला होता.दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या मानून त्यावरील.... हिरा हिरकणी ते सुभेदाराची सून.... हे पुस्तक सुद्धा बाल वाचकांसाठी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या संकल्पने बद्दल त्यांना उदंड शुभेच्छा.
