महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

संघर्ष सामाजिक धान्य बँकेकडून 11 जणांना राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार जाहीर

संघर्ष सामाजिक धान्य बँकेकडून 11 जणांना राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार जाहीर

गेवराई  प्रतिनिधी 

गेल्या चार वर्षांपासून अविरतपणे समाजातील अनाथ, वंचित, शोषित, पीडितांची सेवा करत असलेल्या संघर्ष सामाजिक धान्य बँकेकडून यावर्षी 11 समाजसेवकांचा राष्ट्रसंत गाडगेमहाराज सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासून त्याप्रमाणे वाटचाल करणाऱ्या समाजसेवकांचा हा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आले आहे. समाजासाठी सतत कार्यरत असणारी मंडळी या पुरस्कारासाठी पात्र आहेत. संघर्ष धान्य बँकेच्या संचालक मंडळाने या सर्व मंडळीच्या कार्याचा सविस्तर आढावा व माहिती घेऊन या पुरस्काराची घोषणा  केलेली आहे. राष्ट्रसंत गाडगेमहाराज सेवारत्न पुरस्कारासाठी निवडलेल्या सेवारत्नांमध्ये 1. श्री. राम चौधरी (आदर्श शिक्षक, जि.प.प्रा.शा, सावरगाव), 2. श्री. रत्नाकर वाघमारे (मुख्याध्यापक, कें.प्रा.शा.टाकरवन, ता. माजलगाव), 3. श्री. संदीप कापसे (सहशिक्षक, जि.प.मा.शा. तलवाडा), 4. श्री. सचिन गायकवाड (सेवातीर्थ अनाथाश्रम, मातोरी, ता. शिरूर), 5. श्री. किरणभैया आहेर (सामाजिक कार्यकर्ते, उमापूर), 6). श्री. सुनील मुंडे (पत्रकार, दिव्यमराठी), 7. श्री. ज्ञानेश्वर नवले (सरपंच, भडंगवाडी), 8. श्रीमती चैताली राम दस्तुरकर (आशा सेविका, मादळमोही) यांचा समावेश आहे. तसेच यावर्षीच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श सामाजिक संस्था म्हणून  9) लोकमंगल मैत्री समूह, धोंडराई, 10) वसुंधरा युनिटी फाउंडेशन, शेकटा, व 11) संत निरंकारी मंडळ, धोंडराई या संस्थांचा समावेश आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून सेवारत्नांचे स्वागत व कौतुक होत आहे. सदरील कार्यक्रम हा राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. दीपककाका नागरगोजे (शांतीवन, आर्वी) हे लाभलेले आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अजित कुलकर्णी (अनाम प्रेम, अहमदनगर), श्री. सुरेश राजहंस (सेवाश्रम, आर्वी) श्रीमती मनीषा पवार (आपला परिवार वृद्धाश्रम, कळसंबर), श्री. गोवर्धन दराडे (पसायदान प्रकल्प, ढेकणमोह), श्री. संतोषदादा गर्जे (सहारा बालग्राम, गेवराई), श्री. मिलिंद तुरुकमारे (गटशिक्षणाधिकारी, गेवराई) हे लाभलेले आहेत. या कार्यक्रमासाठी श्री. मयूरराजे वैद्य (शिवरंग उद्योग समूह, बालमटाकळी), श्री. अनिल विधाटे (आदर्श शिक्षक, राहुरी), श्री. शिवनाथ नाना मस्के (जगदंब पतसंस्था, गेवराई) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या संघर्ष सामाजिक धान्य बँकेकडून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येणार असून अविरतपणे समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत होत आहे हे या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून दरवर्षी समाजातील असे समाजसेवा क्षेत्रातील सेवारत्न शोधून त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान संघर्ष सामाजिक धान्य बँकेचे संचालक श्री. शिवाजी झेंडेकर,श्री. संजय पांढरे, श्री. सुभाष काळे, श्री. सुरेश भोपळे, श्री. धर्मराज करपे, श्री. बाळासाहेब गावडे, श्री. भारत साळुंके, श्री. सुरेश नवले यांनी केले आहे.