अण्णाभाऊ साठे यांना केंद्रीय प्रबोधनकार यांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास टाळाटाळ करणाऱ्या केंद्रीय सनदी अधिकारी त्रिवेदी यांच्या कारवाई करावी.
------------------------
गेवराई ( प्रतिनिधी )
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्रीय प्रबोधनकार यांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास टाळाटाळ केल्यामुळे केंद्रीय सनदी अधिकारी विकास त्रिवेदी यांची चौकशी करुण कडक कारवाई करावी या व अशा विविध मागण्यांचे निवेदन महसूल अधिकारी विटेकर यांना बुधवार दि.5 रोजी गेवराई तहसील कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
तहसील कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना केंद्रीय प्रबोधनकार यांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास टाळाटाळ केल्यामुळे केंद्रीय सनदी अधिकारी विकास त्रिवेदी यांची चौकशी करुण कडक कारवाई करावी तसेच महाराष्ट्र शासनाने प्रबोधनकार व समाजसेवक यांच्या यादीमध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा नावाचा समावेश करावा व आशी मागणी निवेदनात केली असून, यावेळी मातंग स्वातंत्र आरक्षण कृती समितीचे समन्वयक आनंद सुतार, दादाराव रोकडे, धोंडीबा हातागळे, नवनाथ धुरंधरे, करण सुतार, अमन सुतार, विशाल थोरात, भैय्या सुतार, बळीराम सुतार, राहुल उमप, संतोष सुतार, प्रदीप सुतार, संदीप सुतार, उज्वल सुतार, रमेश सुतार, रजनी सुतार, निलेश जाधव, राहुल सुतार, प्रवीण सुतार, अक्षय पवार, सर्जेराव हातागळे व सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
