श्री. विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरातील श्री. विश्वकर्मा जयंती उत्सव व मुर्ती प्राणप्रतिष्ठा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत सर्वानुमते श्री. विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे तसेच उपाध्यक्ष म्हणून किशोर वाघमारे, सचिव अक्षय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून या बैठकीत विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संयोजक यांनी सांगितले त्यावेळी विश्वकर्मा प्रतिष्ठान चे अध्यक्ष बबनराव सोनवणे, केशवराव नन्नवरे ,काशिनाथ सांगुळे, भास्कर गायकवाड, मधुकर गायकवाड ,शिवाजी झेंडेकर सर विष्णु गायकवाड,विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे तालुका प्रमुख अशोक गायकवाड, बाबासाहेब सांगुळे,नंदकुमार शिंदे, महेश नन्नवरे, सचिन सांगुळे, रोहित गायकवाड, अभिषेक गायकवाड, मुन्ना गायकवाड, लहु गायकवाड, सचिन सोनवणे, बप्पा गायकवाड, यांच्या सह अनेकांची या नवनिर्वाचित निवडीच्या बैठकीत उपस्थिती होती.
