जीवनदीप अर्बनच्या शुभारंभास उपस्थित रहा:-चेअरमन नितेश पवार
गेवराई (प्रतिनिधी)गेवराई शहरातील पंचायत समिती रोड, बांगर हॉस्पिटल जवळ नव्याने सुरु होत असलेल्या जीवनदीप अर्बन मल्टीपर्पज निधी लि.गेवराई चा भव्य शुभारंभ रविवार दिनांक 19डिसेंबर 2021 रोजी संत महंत मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन नितेश पवार व व्हाईस चेअरमन रोहन राठोड, सचिव भगवान ढेंबरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाने केले आहे
गेवराई येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जीवनदीप अर्बन मल्टीपर्पज निधी लि.गेवराई चा शुभारंभ चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दिलीप बाबा घोगे यांच्या शुभहस्ते होणार असून विशेष उपस्थिती म्हणून आमदार श्री.लक्ष्मणराव पवार , माजी मंत्री श्री.बदामरावजी पंडित, माजी आमदार अमरसिंहजी पंडित, ऋषिकेश चंद्रकांत खैरे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गेवराई चे तहसीलदार सचिनजी खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, न.प.मुख्याधिकारी उमेशजी ढाकणे, रमेशजी खाडे, सुनील मंडले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे गेवराई शहरातील पंचायत समिती रोड बांगर हॉस्पिटल जवळ भव्य शुभारंभ होणार असून या प्रसंगी कोरोना संसर्गामुळे सर्वांनी तोंडाला मास्क लावून उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन नितेश पवार ,रोहन राठोड, भगवान ढेंबरे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आहे
