तिंतरवणी येथे कृषिदर्शन फॉर्मेटेक कंपनीकडून तुर खरेदी सुरुवात आजचे भाव 5500 ते 6000 दराने उत्साहात खरेदी
तांदळा(राहुल हाकाळे)
तींतरवणी येथे कृषिदर्शन फार्मटेक प्रोड्युसर कंपनीकडून तूर खरेदीस उत्साहात सुरुवात!
शिरूर कासार तालुक्यातील तींतरवाणी येथे सर्व शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव शेतकऱ्यांची कंपनी असलेली कृषिदर्शन फार्मटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड द्वारे गेल्या वर्षीपासून सर्व शेतमालाचे खरेदी केंद्र सुरू झालेले असून यावर्षीही तूर खरेदीचा नुकताच प्रारंभ झाला असून या केंद्रावर शेतकऱ्यांना त्यांच्या तुरीच्या मॉइश्चर नुसार 5500 ते 6000पर्यंत भाव मिळत आहे.
तसेच खरेदी केलेल्या मालावर कोणत्याही प्रकारची खर्च आकारली जात नाहीत त्यामध्ये आडत, हमाली,तोलाई,बाजार फी यासारखे कोणतेही खर्च येत नसून बाजार समिती पेक्षा जास्त बाजारभाव या खरेदी केंद्रावर मिळत असून शेतकऱ्यांचा वेळ व खर्च कमी होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला जास्तीतजास्त बाजारभाव मिळण्यास गेल्यावर्षीपासुन सुरुवात झाली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील , तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व आशादायक वातावरण निर्माण झाले आहे तरी या संधीचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी 9763089787 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषिदर्शन फार्मटेक प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सचिन रमेशराव कापरे यांनी केले आहे.
