महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

संविधान हे जगण्याचे ध्येय आणि सत्य - समाधान इंगळे अट्टल महाविद्यालयात संविधान जागृती फेरी व्याख्यान संपन्न

संविधान हे जगण्याचे ध्येय आणि सत्य - समाधान इंगळे

अट्टल महाविद्यालयात संविधान जागृती फेरी व्याख्यान संपन्न 

गेवराई,  (प्रतिनिधी) 
'संविधान हे जगण्यातील ध्येय आणि सत्य यांचे महत्त्वाचे केंद्र आहे. संविधानामुळे असंख्य पिढ्यांचे स्वप्न साकार झाले. मानवतावादी कार्य करणाऱ्या समाजसुधारकांचे, संतांचे, विचारवंतांचे, राज्यकर्त्यांचे संविधानामुळे उद्दिष्ट सफल झाले. तथागत गौतम बुद्धांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रांत्यांचे आणि आंदोलनांचे फलस्वरूप म्हणजे भारतीय संविधान होय. ज्याप्रमाणे आपण प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याप्रमाणेच संविधान दिनही मोठ्या प्रमाणावर साजरा केला पाहिजे. नाहीतर नव्या पिढीला संविधान, संविधानाची उद्देशिका, संविधानातील कर्तव्य आणि जबाबदारी यांचे भान राहणार नाही' असे मत समाधान इंगळे यांनी व्यक्त केले. 
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांच्यावतीने आयोजित संविधान जागृती फेरीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान जागृती फेरीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे पोस्टर आणि बॅनर हाती घेऊन गेवराई शहरातून संविधान जागृती फेरी काढली. विविध ठिकाणी संविधान प्रेमी नागरिकांनी संविधान फेरीला शुभेच्छा दिल्या. शास्त्री चौक येथे लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले. ज्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यानंतर मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संविधान जागृती कार्यक्रमात डॉ. समाधान इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर सटाले यांनी केले, तर मराठी विभागातील प्रा. शरद सदाफुले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रेवणनाथ काळे, डॉ. सुदर्शना बढे, डॉ. सचिन पगारे. डॉ. संदीप वंजारी, डॉ. वृषाली गव्हाणे, प्रा. राहुल माने, प्रा.डी.पी मंचरे, प्रा.दिपक डोंगरे, प्रा.शिंगाडे, प्रा.उदय खरात, प्रा.सचिन खरात, प्रा.वाघ मॅडम आदींची उपस्थिती होती. प्राध्यापक डोंगरे यांनी आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.