महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

जयभवानीच्या उभारणीसाठी दादांनीसुंदरराव सोळंकेेंना बिनविरोध निवडून दिले

जयभवानीच्या उभारणीसाठी दादांनी
सुंदरराव सोळंकेेंना बिनविरोध निवडून दिले
================
गोदावरी आणि सिंदफणेच्या कुशीत वसलेला गेवराई तालुका तसा सिंचनाच्या दृष्टीने पूर्वीपासून समृध्द तालुका म्हणून त्याची ओळख होती. बागायतदार शेतकर्यांना ऊसासारख्या नगदी पिकाचे मोठे आकर्षण होते हीच बाब ओळखून माजीमंत्री शिवाजीराव दादांनी गेवराई तालुक्यात जयभवानी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. आज अनेकजण जयभवानीच्या उभारणीचे श्रेय घेत असतील मात्र खर्या अर्थाने जयभवानीच्या उभारणीला दादांनी अक्षरशः वाहून घेतले होते. त्यांनी केवळ जयभवानी उभा रहावा म्हणून स्व.सुंदरराव सोळंके यांना सन १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत गेवराई मधून बिनविरोध निवडून दिले.

साधारण १९७२ चा तिव्र दुष्काळ सर्वत्र होता, या दुष्काळी परिस्थितीत माजीमंत्री शिवाजीराव दादांनी गेवराई तालुक्यात साखर कारखान्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नपूर्तीसाठी अक्षरशः स्वतःला झोकून देवून त्यांनी काम केले. तोच काळ होता त्यावेळचे विद्यमान मंत्री सुंदरराव सोळंके यांचा केज विधानसभा मतदार संघ राखीव झाला त्यांना सुरक्षित मतदार संघाचा शोध होताच, हीच बाब ओळखून दादांनी त्यांची भेट घेवून त्यांना गेवराई विधानसभा मतदार संघातून उभे राहण्याचे साकडे घातले. पहिल्यांदा सुंदरराव सोळंके यांना सुध्दा दादांचा प्रस्ताव पाहून आश्‍चर्य वाटले, हे कसे शक्य ? असा सवाल त्यांनी केला. त्यावर दादांनी तुम्ही फक्त आम्हाला साखर कारखान्याचा शब्द द्या आम्ही तुम्हाला बिनविरोध निवडून देवू असा शब्द दिला. त्यावेळी सुंदरराव सोळंके सुध्दा अचंबित झाले होते, मात्र केवळ तालुक्यात साखर कारखाना उभा रहावा यासाठी दादांनी स्वतःचे राजकीय डावपेच आखत सुंदरराव सोळंकेंना बिनविरोध निवडून दिले. सुंदरराव सोळंके बिनविरोध निवडून यावेत यासाठी दादांनी तत्कालीन कम्युनिस्ट नेते काशिनाथराव जाधव व अख्तहर बाबर यांना साकडे घालून आपल्या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शाहूराव पवार यांची भेट घेवून त्यांची सुध्दा मनधरणी दादांनी केली होती. केवळ साखर कारखाना उभा रहावा या एकाच ध्येयासाठी दादांनी सुंदरराव सोळंकेंना गेवराई मधून बिनविरोध निवडून दिले. आज जरी अनेकजण त्याचे फार सहजनतेने श्रेय घेत असले तरीही सुंदरराव सोळंकेंना बिनविरोध निवडून देण्याचे काम केवळ शिवाजीराव पंडित यांनी केले हा इतिहास कोणीही नाकारू शकणार नाही. आजच्या पिढीतले अनेकजण जयभवानी कारखान्याची उभारणी आणि सुंदरराव सोळंके यांना बिनविरोध निवडून देण्याचे श्रेय स्वतःच्या राजकीय सोईने इतरांना देण्याचा प्रयत्न करत असले तरी सुध्दा या दोन्ही कामांसाठी आदरणीय दादांनी दिलेले योगदान नाकारता येणार नाही.

गेवराई तालुक्यात ऊस क्रांती करायची या एकाच ध्येयाने प्रेरीत होवून दादांनी त्यावेळी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत काम केले. सुंदरराव सोळंके यांच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करताना त्यांनी प्रशासकीय पातळीवर परवानग्यांसाठी मदत केली असली तरी प्रत्यक्षात सन १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीनंतर शेअर्सपोटी निधी जमा करण्याचे मोठे आवाहन त्यांच्या समोर होते. त्यावेळी किसनराव हिंगे, एम.टी.सरपते, भगवानराव वावरे, रामराव चव्हाण, सुंदरराव पवळ यांच्यासारखे जीवाभावाचे सहकारी दादांसोबत होते. दिवसरात्र एक करून या मंडळींनी गेवराई तालुक्यातील गावागावात जावून लोकांना कारखान्याचे महत्व पटवून दिले. अनेक गावांत लोक त्यांची वाट पाहत असत. पंधरा दिवसांत तीस लाख रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते. दुष्काळी परिस्थितीत चारा तगाईचे आलेले अनुदान जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेअर्स भरण्यासाठी कर्ज अशा अनेक नामी युक्त्या करून मिळेल त्या पध्दतीने दादांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने ही अशक्य बाब शक्य करून दाखवली होती. महाराष्ट्रात इतक्या विक्रमी वेळेत तीस लाख रुपये शेअर्स जमा करणे आणि आठ दिवसांत कारखान्यासाठी भुसंपादन पूर्ण करणारा जयभवानी हा एकमेव कारखाना होता. राज्यभरातून त्यावेळी दादांचे कौतुक केले जात होते. कारखान्याला परवानगी मिळाल्यानंतर दादांनी तुळजापूरला जावून भवानी मातेचे दर्शन घेतले आणि त्याचवेळी जयभवानी हे कारखान्याचे नाव निश्‍चित झाले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते कारखान्याचा भुमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला होता, या कार्यक्रमाला लाखोंची उपस्थित होती.

तत्कालीन परिस्थितीत मराठवाड्यात अधिकारी यायला तयार नव्हते, त्यामुळे अनेक दिवस कारखान्याचे एम.डी. पद रिक्त होते. त्यावेळी बीडला पवार नावाचे उपजिल्हाधिकारी होते. अत्यंत हुशार आणि कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता, दादांनी त्यांना एम.डी.होण्याची विनंती केली आणि त्यावेळी दादांच्या शब्दाखातर उपजिल्हाधिकारी असलेल्या पवार यांनी कारखान्याची सुत्रे घेतली. एकामागून एक अशा अनेक व्यक्ति वेगवेगळ्या पदावर काम करण्यास तयार झाल्या. दादांना माणसे ओळखण्याची पारख होती. कारखान्याचे काम चालू असताना गढीच्या डोंगरावर अक्षरशः मंडप आणि राहुट्या उभारून दादा पूर्णवेळ झोकून देवून कारखाना उभारणीचे काम करत होते. दिवसरात्र एक करून प्रचंड मेहनत घेवून त्यांनी कारखान्याची उभारणी केली. यासाठी तत्कालीन मंत्री मंडळातील एकटे सुंदरराव सोळंकेच नव्हे तर इतर मंत्र्यांनी सुध्दा त्यांना मोलाची मदत केली. जयभवानीच्या उभारणीमुळे तालुक्यात मोठी अर्थक्रांती झाली.

जयभवानीच्या उभारणीमुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकर्या मिळाल्या, ऊसाचे क्षेत्र वाढले, नगदी पिकामुळे शेतकर्यांना पैसा मिळाला. एकट्या जयभवानीमुळे गेवराई तालुक्यातील अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळाली, हजारोंच्या घरातली चूल पेटली, हाताला काम मिळाले, अनेक फायदे जयभवानीच्या उभारणीमुळे झाले. माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कोणताही राजकीय वारसा नसताना जयभवानी साखर कारखान्याचे स्वप्न उराशी बाळगून ते वास्तवात आणल्यामुळे तालुक्याची खर्या अर्थाने जडणघडण झाली. सहकारमहर्षी दादांना अनेक गोरगरीबांचे आशिर्वाद लाभले, त्यांना निरोगी, आनंददायी उदंड आयुष्य मिळो हीच यानिमित्ताने आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

भाऊसाहेब नाटकर
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 
गेवराई.
मो.९४०५७९००००