सुशील जेथलिया यांचे निधन
गेवराई प्रतिनिधी
येथील उद्योजक सुशील मदनलाल जेथलिया (वय वर्ष 45) यांचे रविवार ता. 24 रोजी सकाळी नऊ वाजता र्हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. माजी आमदार सुरेश जेथलिया यांचे ते पुतणे होत.
रविवार ता. 24 रोजी सकाळी शहरातील रभ अट्टल महाविद्यालयाच्या ग्राऊंड वर व्यायाम करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, त्यांनी स्वतःच एका खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. संबंधित डॉक्टरांनी त्यांना तपासून आधार रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली. त्यांना तातडीने आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्यावर चिंतेश्वर स्मशानभूमित रविवारी चार वाजता
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर , माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुरेश जेथलिया, माजी नगराध्यक्ष राधेश्याम अट्टल, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर, नातेवाईक, समाज
बांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात
वडील, भाऊ, पत्नी दोन मुल असा मोठा परिवार आहे. सुशील यांच्या अकाली मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे.
