कलापथक अनुदान समितीवर महाराष्ट्र शासनाकडून शाहीर विलास सोनवणे यांची वर्णी
गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांच्या पथकांना अनुदान मंजूर करण्यासाठी असलेल्या समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने सुप्रसिद्ध लोककलावंत तथा रा.काँ. प्रणित चित्रपट, साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाचे मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष शाहीर विलासबापू सोनवणे यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ८ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील कलापथकांना भांडवली खर्चासाठी व प्रयोग अनुदान मंजुरीसाठीच्या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून पुढील ३ वर्षासाठी नियुक्ती केल्याचे राज्याचे उपसचिव विलास थोरात यांनी कळविले आहे. लोककला टिकून राहाव्यात व लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलेला उत्तेजन देण्याच्या हेतूने ही समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक असून सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, विलास सोनवणे यांच्यासह १२ सदस्य या समितीवर आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक या समितीचे सदस्य सचिव राहतील. या नियुक्तीनंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. अमित देशमुख, पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे, बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँ. पार्टीचे सरचिटणीस माजी आ. अमरसिंह पंडित, बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रणित चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाचे राज्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा चित्रपट कलावंत डॉ. सुधीर निकम, शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे, जिल्हा कार्यवाह अॅड. वारे, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र बरकसे, संघटक मजमुले, तालुका कार्यकारिणी अध्यक्ष शेखर मोटे, शहराध्यक्ष आनंद दाभाडे, कैलास टोणपे, प्रा.प्रमोद झेंडेकर, प्रा. शरद सदाफुले, दत्ता लाड, अंकुश आतकरे, सुंदर कांबळे, महेश नागरे, अंबादास कापसे यांच्यासह अॅड. सुभाष निकम, प्रकाश भुत्ते, विष्णू खेत्रे, प्रशांत रुईकर, मुकुंद टाक आदी कलावंत -साहित्यीक यांनी शाहीर विलासबापू सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे.
