लोंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिक त्रस्त
गेवराई ( प्रतिनिधी)वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे तहसील रोड, दाभाडे गल्ली येथे वीज वाहक तारा खाली लोंबकळत असून त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
या लोंबकळणाऱ्या तारांमुळे रहदारीच्या लोकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दाभाडे गल्ली मधील एक खांबाला ट्रॅक्टरची दोन वेळा धडकही बसली होती. त्यामुळे खांब पुर्णपणे वाकला असुन तारा तुटून दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे. विजेच्या तारा अगदी हात पोहोचेल अशा अंतरावर आल्या आहेत यामुळे लोंबकळत असणाऱ्या तारा ओढून पुन्हा ताठ किंवा पूर्ववत कराव्या,नसता अद्याप लोंबकळत असणाऱ्या विजेच्या तारांबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वकर्मा वंशीय समाज संघटना गेवराई तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे
