पोक्सो, बलात्कार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर- अँड गणेश कोल्हे
गेवराई प्रतिनिधी
गुंदा ता. जी. बीड येथील नवतरुण नितीन चंदू अंधारे यांच्यावर पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुर नं २६/२०२१. भा. द.वि. 363, 366अ, 376 (2)(n) आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
नितीन अंधारे हा नवतरुण मजुरी करून आपल्या कुटुंबाचे गुजराण करत होता. परिस्थिती हालाखीची व नाजूक असल्यामुळे अडचणी वाढत होत्या. परंतु सामाजिक वादातील राग मनात धरून, खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. गुन्हा दाखल होताच अँड गणेश कोल्हे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालय बीड येथे जामीन अर्ज करून,अँड गणेश कोल्हे यांनी सक्षम व सत्य बाजू न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे दि. 6 जुलै रोजी मा. जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच अँड गणेश कोल्हे यांना अँड,सचिन खाडे यांनी मदत केली.
