गोरगरीबांची जाण असणारा लढवय्या नेता:धम्मपाल कांडेकर
गेवराई शहरातील भिम नगर येथिल रहिवासी असलेले धम्मपाल प्रभाकर कांडेकर हे सामाजिक चळवळीत नेहमी तत्पर असतात
धम्मपाल प्रभाकर कांडेकर यांचे शिक्षण शहरातील नामाकिंत न्यु हायस्कुल शाळा गेवराई येथे 1ते 10 पर्यंत व उच्चशिक्षित शिक्षण 12वी पर्यंत र.भ अट्टल महाविद्यालयात पुर्ण झाले आहे धम्मपाल कांडेकर यांनी अगदी वयाच्या लहान पणापासुन समाजसेवा करण्यास सुरवात केली. त्यानंतर सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन त्यांनी वंचित घटकांना न्याय मिळुन देण्यासाठी सतत शासन दरबारी प्रयत्न केले त्यात त्यांना यश ही आले आहे समाजसेवा करत असतांनी रक्तदान शिबीर,रुग्नाला फळे वाटप, झाडे लावा झाडे जगवा असा अगळा वेगळा उपक्रम त्यांनी राबवला,अनाथाना खावु वाटप,विद्यार्थ्याला वह्या पुस्तक वाटप, अंध ,अपंग, वयोवृंद यांना तहसिल कार्यालयामध्ये संजय गांधी, श्रावणबाळ या योजने अतर्गंत योग्य तो न्याय मिळुन देतात. आपघातग्रतांना मदत करतात तसेच क्रिकेट स्पर्धेचे चांगल्या अयोजन करतात. जनतेच्या हाकेला ओ देत धावुन येणारे गरीबांना मदतीचा हात देणारे धम्मपाल कांडेकर लढवया पॅंथर्स म्हणुन सर्व पराचित झाले आहे
तसेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत त्यांनी या आधी विविध पदावर काम केले आहे त्या पदाला त्यांनी न्याय दिला आहे व पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली त्यांनी सर्व समाज बाधंवाना सोबत घेऊन काम केले आहे त्यांनी लोकांची नाळ कधिचं तोटु दिली नाही .धम्मपाल कांडेकर यांची युवकामध्ये मोठी क्रेज आहे त्यांनी युवकांच्या विविध प्रश्नावर आक्रमक भुमिका घेऊन न्याय देण्याचे काम केले आहे.
समाजसेवा करत असतांना2002मध्ये सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन शिव फुले आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातुन विविध मागण्यासाठी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन अन्यायला वाचा फोडणारा पॅंथर्स लढवया नेता म्हणजे धम्मपाल कांडेकर होय. तसेच विविध मागण्यासाठी बहुजन ऐक्य गायरान मोर्चा समितीच्या वतीने तहसिल कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपल्या कुटुंबांचा उदार निर्वाह भागावा या करीता अनेक बेरोजगारांनी रिक्षा चालकांचा व्यवसाय सुरु केला होता रिक्षा चालकांना अनेक अडचणीला समोरे जावे लागत होते त्यांच्या अडचणी दुर करण्या रिक्षा युनियची स्थापना केली होती. सर्वात पहीले आंदोलन त्यांनी 2005मध्ये पुरग्रस्तासाठी मदत मिळावी यासाठी भव्य मोर्चाची उभारणी करण्यात आली होती व जि.प.बांधकाम उपविभाग, गेवराई या कार्यालयाचे अभियंता सतत गैरहजर असल्यामुळे जलसाठ्याचे काम खोळंबत होती यांची दखल घेत त्यांनी22/07/2008रोजी गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले होते याचा परीणाम त्यांच्यावर झाला नाही तेव्हा 25/07/2008रोजी जि.प. बांधकाम उपविभाग गेवराई या कार्यलयाला कुलुप ठोकले होते व त्यांची प्रशासनाने दखल घेतली होती. तसेचं गेवराई शहरातील उपजिल्हा रुग्नालयात13जनाचा स्टाप असतांना केवळ 04 जनावर दवाखाना चालत असतांना त्यांनी या संबधी प्रभारी अधिकारी यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत त्यांनी 02पदे जानेवारी 09 ला भरती केली होती.गोरगरीब, कष्ठाळु,शेतमजुर,बहुजन दिन दलितांची नावे कमी करण्यात आले होते दारीद्रय रेषेतील खरे लाभार्थी वंचित न राहता त्यांना लाभ मिळावा यासाठी गेवराई तालुक्यासह गेवराई शहराचा पुनसर्व्हे करण्यात यावा गोरगरीबांना न्याय मिळण्यासाठी शासकीय सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्वस्त धान्य स्वस्तात गोरगरीबांना मिळण्यासाठी दारीद्र्य रेषेमध्ये नाव असणे आवश्यक व अत्यंत गरजेचे आहे यासाठी शासनाने पुनसर्व्हे करावा यासाठी त्यांनी मागणी केली होती.तसेच गेवराई तालुक्यात सर्वात जास्त जिनिंग निर्मान झालेल्या बहुतांशी जिनिंग मालक हे महाराष्ट्रा बाहेरील असुन त्यांनी जिनिंगच्या नावाखाली परप्रांतीय कामगार तसेचअनेक बाल कामगार आणले होते अशा मगरुर जिनिंग मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना संबधी ग्रामसेवकांला प्रशिक्षण देण्यासाठी पैठण येथे गेलेल्या गेवराई पं.समिती च्या तीन जेष्ठ ग्रामसेवकांनी दारु पिवुन चांगलाच धिंगाना घातला होता याप्रकरणी कार्यवाही न झाल्याचे पिदाड्या ग्रामसेवकावर मुख्य कार्यकारी अधिकारी यानी कार्यवाही करावी अशी त्यावेळी धम्मपाल कांडेकर यांनी केली होती या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने धम्मपाल कांडेकर यांच्या प्रयत्नाला यश ही आले होते. तसेच विविध शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी विविध धरणे आंदोलन, अमरण उपोषण , मोर्चे काढुन निराधारांना न्याय मिळुन दिले आहेत अजुन ही देतात तसेच त्यांनी गेवराई तालुक्यातील गायरान जमिन नावावर करण्यात यावेत या मागणीसाठी त्यांनी गेवराई तहसिल कार्यालय येथे उपोषन केले होते तसेचं धम्मपाल कांडेकर हे सतत मदतकार्य करतात त्याचे उदारण म्हणजे गेवराई तालुक्यातील रामपुरी येथिल रहिवासी दत्ताञय ज्ञानेश्वर मस्के हे श्रीरामपुर ते बीड बसने प्रवास करीत असतांना त्यांना गढी जवळ तिव्र झटका आल्याने ते बेसुध्द अवस्थेत असतांना सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल कांडेकर यांनी मस्के यांना उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले होते पंरतु उपचारा दरम्यान मस्के यांचा मुत्यु झाला धम्मपाल कांडेकर यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. एस टी. महामंडाळाने प्रवाशाना वीमा उतरविलेला असल्याने मस्के कुटुबांना अर्थिक सहकार्य करावे अशी मागणी त्यावेळी काडेंकर यांनी केली होती व महात्मा फुले,मौलाना अझाद विकास महामंडळ जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत जिल्हातील व तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळुन देण्यासाठी वेळोवेळी बॅंकेच्या अधिकार्र्याना पाठपुरावा केला व शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळुन देण्याचं काम त्यांनी केले आहे त्यानंतर गेवराई तालुक्यातील तलाठ्यांनी सज्जावर जावे या मागणीसाठी तलाठ्यांच्या खाजगी कार्यालयासमोर ताळे ठोक आंदोलन केले होते. तसेच गेवराई शहरातील भिम नगर येथे घरावरुन जाणार्र्या विद्युत तारा काढण्यात यावे यासाठी कानिष्ठ अभियंता विद्युत महामंडळ यांना निवेदन देण्यात आले होते. गेवराई तालुक्यातील व शहरातील अनुदानीत व विना अनुदानीत कायम विना अनुदानात शाळा व महाविद्यालयामध्ये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारु नये अशी मागणी त्यांनी केली होती .तसेच गेवराई तालुक्यातील अंगणवाडी, शौचालय,दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचार करणार्र्या दोषीवर निलंबणाची कार्यवाही करावी यासाठी पं.स.गट विकास अधिर्र्याच्या कार्यलयासमोर बाळु साबळे यांनी धरणे अंदोलन केले होते त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला होता अशा प्रकारे ते सतत विविध प्रश्नावर नेहमी अाक्रमक असतात. अशा आदर्श युवा नेत्यांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लेखक:शुभम घोडके (पञकार)
मो.8308390008
