वंचित बहुजन आघाडी गेवराई कार्यालय येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी
गेवराई प्रतिनिधी
शाहू महाराजांचा जन्म 16 जून 1974 मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात झाला शाहू महाराजांचे पूर्वीचे नाव यशवंत होते शाहू महाराजांनी समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार केला त्या काळात अस्पृश्यांना वेगळ्या शाळा भरल्या जात होत्या ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अशा शाळा भरवण्याची पद्धत त्यांनी बंद केली बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत समजावून घेण्यासाठी 1916 साली त्यांनी निपाणी येते डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली अभ्यास व शैक्षणिक सहली याद्वारे मिळवलेले व्यवहारज्ञान यामुळे शाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते राधानगरी धरणाची उभारणी शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करुन देणे अशा उपक्रमातून मधून ही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष दिले अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद केली त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या शाळा दवाखाने सरकारी इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागण्याचेआदेश त्यांनी काढले महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवलीशाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत चित्रपट चित्रकला कुस्ती या कलावंतांना मोफत प्रोत्साहन दिले त्याकाळात अनेक जामाती चोऱ्या दरोडे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत होते त्या जातीच्या लोकांना शाहूमहाराजांनी एकत्र करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या ह्या अशा महामानवास वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सय्यद सुभान भाई सुधाकर केदार सुनील सदाफुले बाबुराव गायकवाड सुनील पोपळे बाळू खंडागळे सय्यद आसेफ जावेद शेख सोहेल सय्यद बंटी सौंदरमल कैलास भोले बाळू पटेकर महेश माटे विवेक डोंगरे विशाल आठवले समाधान भोले आदी पद अधिकारी उपस्थित होते