किनगाव गावचे माजी सरपंच वैजिनाथराव आश्रूबा चाळक यांचे दुःखद निधन झाले.
गेवराई( प्रतिनिधी )
जय भवानी सहकारी साखर कारखाना गढी -शिवाजीनगर कारखान्यांचे माजी चेअरमन तथा किनगाव गावचे आदर्श सरपंच स्व. वैजिनाथराव आश्रूबा चाळक यांचे आज दुःखद निधन झाले. संपत्ती, दातृत्व आणि विनय यांचा त्रिवेणी संगम त्यांचेठायी होता. प्रेमळ स्वभाव आणि आपुलकी ही त्यांची ओळख होती.कोणत्याही सत्कार्य करण्यात त्यांचे योगदान अग्रभागी असत.आज त्यांच्या जाण्याने समस्त किनगाव गावची अपरिमित हानी झाली आहे. मदतीकरिता अखंड वर असणारा हात आज अस्त पावला आहे. गावच्या विकासा करिता त्यांनी दिलेले योगदान कायम आठवणीत राहील .त्यांनी केलेल्या सत्कर्मामुळे त्यांच्या पश्चात "उत्तमचि उरे कीर्ति मागे" हे संतवचन त्यांच्या बाबतीत सार्थ झाले आहे. चाळक कुटुबीयांच्या दुःखांत सहभागी दै महाभारत सा प्रकाश आधार सा लोकनाथ परिवार सहभागी आहे.
