शाब्बास, संदीप भाऊ,अक्षय भैय्या, तुमच्या कार्याला सलाम !
कोरोनाच्या संकटकाळात संदीप मडके, अक्षय पवार यांचे उल्लेखनीय कार्य
गेवराई प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारिने सर्वत्र थैमान घातले आहे. अशा या संकट काळात मा.आ. अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष संदीप मडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार हे रूग्णांना बेड मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या इतर काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या महामारित रूग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आधार देण्याचे काम करत असल्याने संदीप मडके, अक्षय पवार यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
एकीकडे गेवराई तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना अनेक अडचणी येत आहेत. कधी कधी एखादा रुग्ण गंभीर असेल तर त्याला तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी तसेच बेड मिळत नसेल तर बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी अन्य काही अडचणी असतील तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना शासकिय आरोग्य योजनेच्या माध्यमातुन लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. यासह अन्य काही अडचणी असतील तर त्या सोडविण्याचे काम राष्ट्रवादी सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष संदीप मडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार हे प्रामाणिकपणे करत आहेत. विशेष म्हणजे याचा कुठलाही गाजावाजा न करता समाजाचे देणे लागते या उदांत हेतूने या दोघांचे कार्य सुरु आहे. कोरोनाच्या संकटकाळात संदीप मडके, अक्षय पवार हे रूग्णांना आधार देण्याचे काम करत असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भैय्यासाहेब, विजयराजेंची लोकसेवेची शिकवण
मा.आ.अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत आहोत. कोरोना संकटाच्या काळात आम्ही मदत म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणुन रूग्णांना आधार देण्याचे काम आम्ही करत आहोत.आमचे नेते मा.आ.अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांची आम्हाला लोकसेवेची शिकवण आहे. अशी प्रतिक्रीया संदीप मडके, अक्षय पवार यांनी दिली आहे.
