गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाच्या पारायणाने आत्महत्या थांबतील-प्रा.लक्ष्मण गुंजाळ
बीड प्रतिनिधी
कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार च्या वतीने ता 17मे ते 24मे पर्यंत महापुरुष विचार आँनलाईन व्याख्यान माला आयोजित करण्यात आली होती.
ता.18मे रोजी प्रा.लक्ष्मण गुंजाळ यांचे म.जोतीराव फुले यांच्या समग्र चळवळीची आज ही गरज! या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.सार्वत्रिक,मोफत आणि सक्तीचे शिक्षणाची संकल्पना आज देखील पुर्ण झालेली नाही. राष्ट्रीय उदिष्टे आणि अभ्यासक्रमाचा ताळमेळ बसलेला नाही. धर्म आणि धर्मचिकित्सा ज्या धाडसाने,द्रुष्टीकोनातुन केली त्याचे आकलन आम्हाला झालेले नाही परिणामी आम्ही सत्यशोधक होऊ शकलो नाहीत. म.फुले यांची ग्रंथसंपदा ही दिशा दर्शक आहे. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी हे ग्रंथ अभ्यासक्रमात असते तर कष्टाळू, प्रामाणिक, समस्यांवर मात करणारा स्वाभिमानी नागरिक तयार झाला असता. आज होत असलेल्या आत्महत्या झाल्या नसत्या, असे प्रतिपादन यावेळी प्रा.गुंजाळ यांनी केले. म.फुले यांची समग्र चळवळ ही देशाची कार्यक्रम पत्रिका व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.संजय तुपे होते. परिचय,प्रास्ताविक आणि आभार डॉ. पवळे यांनी केले.डा.अशोक घोळवे, डॉ. विठ्ठल जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.