प्रभाग वाईज लसीकरण केद्र सुरू करून जेष्ठ नागरिकांची गैरसोय सुरू करा- मा. नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गेवराई / प्रतिनिधी
देशात महामारीने पुन्हा एकदा थैमान घातले आहे अशा भयानक परिस्थितीत अनेक जण आपल्याला अचानक सोडून गेले आहेत तरी अनेक ठिकाणी रूग्णांना अनेक समास्याचा सामना करावा लागत आहे तरी कोरोनोला प्रतिबंध करण्यासाठी कोवीड लसीकरण केद्र सुरू आहे तिथे सुध्दा आता १८ वर्षा पुढील व्यक्ती चे लसीकरण करण्याची घोषणा केली तेव्हा पासून लसीकरण केद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे तरी शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण केद्र सुरू करून वयोवृद्ध महिला पुरुष याची गैरसोय दुर करावी अशी मागणी मा.नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे यांनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे
दिलेल्या निवेदनात ते म्हणाले की महाराष्ट्रात लसीकरण सुरू झाले तेव्हा नागरिक लसीकरण करुन घेण्यास टाळटाळ करत होते पण कोरोनो महामारीची दुसरी लाट उसळली आणि अनेक युवक तरूण कोरोनो चे बळी ठरले आहेत ्त्यामुळे नागरिक आपोआप लसीकरण केंद्राकडे गर्दी करू लागला आहे त्यामुळे लसीकरणाचा तुटवडा निर्माण होऊ लागला त्त्यातच सरकारने १८ पुढील व्यक्ती ना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे लसीकरण केद्रावर युवक तरुण व जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत तरी प्रभाग वाईज लसीकरण केद्र सुरू करून जेष्ठ नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी मा. नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधंरे यांनी तहसीलदार याना दिलेल्या निवेदनात केली आहे
