महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

गेवराईत रक्तदान शिबिरालादात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

गेवराईत रक्तदान शिबिराला
दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

गेवराई (प्रतिनिधी दै महाभारत )कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी समजून कोरोना रूग्णांसाठी नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या कोरोना रुग्णसेवा समितीच्या वतीने गेवराई येथे आज 30 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दु.1 वाजेपर्यंत 30 दात्यांनी रक्तदान केले असून यात महिलांचाही सहभाग घेतला होता.


गेवराई शहर व तालुक्यातील कोरोना रूग्णाची सेवा व प्रशासनाला सहाय्य मिळावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, शिक्षक, पत्रकार, प्राध्यापक, व्यापारी व नागरिक यांनी स्थापन केलेल्या कोरोना रूग्ण समितीने आपल्या रुग्ण सेवा कार्याला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेवराई येथे आज शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सिंधी भवन येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. यावेळी मंगलनाथ बँक चे चेअरमन केशव पंडित यांच्याकडून 50 टी-शर्ट भेट देण्यात आले. या शिबिराला तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, जनआंदोलन समितीचे राज्य सदस्य ऍड.अजित देशमुख, डॉ.कुचेरीया यांच्यासह आदींनी भेटी देत या समितीच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
दरम्यान यावेळी कोविड बाबतच्या सर्व नियमांचे पालन करत टप्प्याटप्प्याने ५-५ रक्तदात्यांना वेळेवर बोलावून हे रक्तदान शिबीर सुरू आहे. या शिबीरात गेवराई तालुक्यातील दात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत रक्तदान केले असून दुपारपर्यंत एकूण 30 जणांनी रक्तदान केले होते.